शेअर बाजाराचे नियमन करणाऱ्या नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडने (NSDL) तीन परदेशी गुंतवणुकदारांवर कारवाई केली. एनएसडीएलने कारवाई केलेल्या या तिन्ही परदेशी गुंतवणूकदारांकडून अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आलेली आहे. मात्र, त्यांची खातीच एनएसडीएलने सील केल्यानं याचे पडसाद शेअर मार्केटमध्ये दिसून आले. त्यामुळे सोमवारी अदानी ग्रुपच्या कंपन्याचे शेअरचे भाव घसरू लागले आणि ग्रुपच्या फ्लॅगशिप कंपनी अदानी एन्टरप्राईजेसचे शेअर्स २५ टक्क्यांनी घसरले, तर सर्व ग्रुप कंपन्यांच्या शेअर्सनी खालची पातळी गाठली.

NSDL ने नंतर या समूहाला स्पष्टीकरण दिले. कंपनीच्या शेअरहोल्डरांची खाती सक्रिय आहेत आणि एका दुसर्‍या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. अदानी समूहानेही यावर निवेदन प्रसिद्ध केले होते आणि माध्यमांच्या वृत्तांवर टीका केली होती. गुंतवणूकदारांची खाती सक्रिय असल्याचे कंपनीने सांगितले होते, परंतु त्यानंतरही अदानी समूहाच्या शेअर्समध्ये फारशी सुधारणा झालेली नाही. आजही अदानी गॅस, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी पॉवरच्या शेअर्सनी खालची पातळी गाठली.

अदानी ग्रृपचे मुख्य वित्तीय अधिकारी म्हणाले…

दरम्यान, या प्रकरणावर अदानी ग्रृपचे मुख्य वित्तीय अधिकारी जुगेशिंदर सिंह यांनी एनडीटीव्हीला माहिती दिली. ते म्हणाले NSDL ने २०१६ मधल्या एका प्रकरणात ही कारवाई केली आहे. वृत्त पसरल्यानंतर कंपनीने गुंतवणूकदारांना याबाबत स्पष्टीकरण मागितले, तर मग कोणतेही खाते गोठविले नसल्याचे समजले.

गुंतवणूकदारांच्या केवायसीचे काम कंपनीचे नाही, ते नियामकाचे आहे. पारदर्शकतेसाठी कंपनी पारदर्शकता प्रमाणपत्र पाहते. कंपनीचे डिस्क्लोजर कागदपत्रे यापेक्षा वेगळी नाहीत. त्यांची गुणवत्ता देखील स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध असलेल्या इतर कंपन्यांप्रमाणेच असल्याचे सिंह म्हणाले.

हेही वाचा- अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे शेअर्स कोसळले; NSDL च्या कारवाईचे शेअर बाजारात उमटले पडसाद

गुंतवणूकदारांनी सेबीच्या नियमांचे पालन न केल्याच्या प्रश्नावर जुगेशिंदर सिंह म्हणाले, हा प्रश्न नियामक व गुंतवणूकदारांना विचारला पाहिजे, हे माझ्या अधिकाराच्या बाहेरचा विषय आहे. ते दोघेही एकमेकांशी व्यवहार करतात. ते म्हणाले की ‘आमच्यासाठी पारदर्शकता, डिस्क्लोजर आणि वेळेवर अहवाल देणे फार महत्वाचे आहे, आम्ही त्याचा प्रचार करतो.’

हेही वाचा- सेन्सेक्स-निफ्टी नव्या शिखरावर

अदानी ग्रुपच्या कंपन्यांविषयी ते म्हणाले, या कंपन्या २ ते ३ वर्ष जुन्या असून ५ ते ७ वर्षांनंतरही या कंपन्या वाढत राहतील. आम्ही युवा कंपनी आहोत आणि वेगाने वाढत आहोत. कंपनीचे शेअर्स वाढत आहेत. सीएफओने सांगितले की कंपनी एक युटिलिटी प्लॅटफॉर्म आहे, परंतु भारतात अद्याप युटिलिटी इंडेक्स नाही. ते म्हणाले की कंपनीला वैविध्यपूर्ण रजिस्टर टिकवायचे आहे आणि त्यासाठी काम करत आहे.

अदानी ग्रुपमधील कोणत्या कंपन्यांवर झाला परिणाम?

एनएसडीएलने केलेल्या कारवाईचे वृत्त समोर येताच शेअर बाजारात याचे पडसाद उमटले. अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कोसळले. अदानी इंटरप्राईजेसचे शेअर १५ टक्क्यांनी घसरून १,३६१.२५ रुपयांवर आले. तर अदानी पोर्ट अॅण्ड इकॉनॉमिक झोन या कंपनीचे शेअर्सचे भाव १४ टक्क्यांनी खाली आले आहेत. अदानी पावरच्या शेअर्सवरही याचा परिणाम दिसून आला. कंपनीच्या शेअर्सचे भाव ५ टक्क्यांनी घसरले. त्याचबरोबर अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी टोटल गॅस या कंपन्यांचे शेअर्सच्या भावामध्येही प्रत्येकी ५ टक्क्यांची घसरण झाली आहे.

तीन गुंतवणुकदारांवर का करण्यात आली कारवाई?

कारवाई करण्यात आलेल्या तिन्ही खात्यांचे गुंतवणूकदार मॉरिशिसस्थित असून, अदानी इंटरप्राईजेसमध्ये ६.८२ टक्के, अदानी ट्रान्समिशनमध्ये ८.०३ टक्के, अदानी टोटल गॅसमध्ये ५.९२ टक्के, तर अदानी ग्रीन एनर्जी या कंपनीमध्ये ३.५८ टक्के गुंतवणूक केलेली आहे. या संबंधात अदानी समूहाकडून कोणतंही भाष्य करण्यात आलेलं नाही. इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार खातेदारांच्या मालकी हक्कांविषयी पुरेशी माहिती न दिल्याच्या कारणावरून ही कारवाई करण्यात आलेली आहे. खाती गोठवण्यात आल्यामुळे हे तिन्ही गुंतवणूकदार स्वतःकडील शेअर्स विकू शकत नाही आणि नवीन खरेदीही करू शकत नाहीत.