News Flash

जम्मू-काश्मीर: पुलवामामध्ये चकमक; दहशतवाद्याचा खात्मा

अद्यापही दोन दहशतवादी दडून बसल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

संग्रहित छायाचित्र.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान काकापुरा येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर जवानांनी दहशतवाद्यांना घेरले. त्याठिकाणी अद्यापही दोन दहशतवादी दडून बसल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस आणि जवानांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे.

भारतीय लष्कराने सप्टेंबरमध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी अड्ड्यांवर सर्जिकल स्ट्राइक केला होता. त्यानंतर पाकिस्तान आणि दहशतवादी संघटना अस्वस्थ झाल्या आहेत. पाकिस्तानच्या सैन्याकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसखोरी करता यावी, यासाठी पाकिस्तानच्या सैन्याकडून मदत केली जात आहे. पाकिस्तानी सैन्याकडून भारतीय सैन्यांच्या चौक्यांच्या दिशेने उखळी तोफांचा मारा करण्यात येत आहे. शनिवारीही पाकिस्तानने ६ तासांमध्ये दोनदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टर आणि नियंत्रण रेषेनजीक भारतीय चौक्यांवर पाकिस्तानकडून उखळी तोफांचा मारा करण्यात आला. तसेच गोळीबारही करण्यात आला.

पाकिस्तानी सैन्याने सकाळी साडेदहा वाजता नौशेरा सेक्टरमध्ये उखळी तोफांचा मारा आणि गोळीबार केला. पाकिस्तानकडून करण्यात येणाऱ्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिला जात आहे. गोळीबारात आतापर्यंत कोणतीही हानी झाली नाही. दोन्ही बाजुंनी गोळीबार सुरू आहे, असे लष्कराच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2016 6:18 pm

Web Title: one terrorist killed in an encounter in kakapora pulwama operation underway
Next Stories
1 …आणि अरविंद केजरीवाल बीबीसीच्या पत्रकारावर भडकले
2 जेटली काहीही न करता ढिम्म बसलेत; चलनसंकटावरून स्वामींचा हल्लाबोल
3 पाकिस्तानकडे १३० ते १४० अण्वस्त्रे; अण्वस्त्रांच्या माऱ्यासाठी एफ १६ विमानांमध्ये बदल
Just Now!
X