07 July 2020

News Flash

जम्मू-काश्मीर : एका दहशतवाद्याचा खात्मा, अवंतीपोरा भागात चकमक सुरू

पाकिस्तानी सैन्याकडून सीमेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच

जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरा भागातील त्रालमधील सिमोह परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. दरम्यान, एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.

या अगोदर पाकिस्तानी सैन्याने शनिवारी सकाळापासून रविवार सकाळ पर्यंत सीमेवरील चौक्यांसह रहिवासी भागांना लक्ष करत गोळीबार केला होता. कीरनी पासून बालाकोटपर्यंत शंभर किलोमीटर पेक्षा जास्त लांब नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून कुरपाती करणे सुरूच आहे. पाकिस्तानी सैन्याकडून झालेल्या गोळीबारात मेंढर सेक्टरमध्ये काही जनावरं देखील जखमी झाले तर घरांचेही नुकसान झाले आहे.

तर, दुसरीकडे पाकिस्तानी सैन्याकडूनही सीमेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात येणाऱ्या गोळीबारास भारतीय जवानांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले. ज्यामध्ये सहा पाकिस्तानी सैनिक गंभीर जखमी झाले, शिवाय त्यांच्या काही चौक्या देखील उद्धवस्त झाल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2020 9:01 am

Web Title: one terrorist killed in an encounter that has begun at saimoh area of tral awantipora msr 87
Next Stories
1 करोनापाठोपाठ इबोलाचा नव्याने उद्रेक; काँगोमध्ये चार जणांचा मृत्यू
2 रेल्वेत एकाही प्रवाशाचा अन्न-पाण्यावाचून मृत्यू झालेला नाही; रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचा दावा
3 ‘मुडीज’कडून भारताच्या पतमानांकनात घट
Just Now!
X