संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांचा भंग करून भारत नियंत्रण रेषेजवळ भिंत उभारत आहे, असा नवा आरोप पाकिस्तानने शुक्रवारी सुरक्षा मंडळात केला. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाचे अध्यक्ष, रशियाचे राजदूत विटले चर्कीन यांना पाकिस्तानचे राजदूत मलिहा लोधी यांनी पत्र लिहिले असून त्या पत्रामध्ये हा आरोप करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर आणि पाकिस्तानमधील १९७ किलोमीटर लांबीच्या नियंत्रण रेषेवर १० मीटर उंच व १३५ फूट रुंदीची िभत उभारण्याची भारताची योजना असून, त्याद्वारे नियंत्रण रेषेचे रूपांतर कायमस्वरूपी आंतरराष्ट्रीय सीमेत करण्याचा भारताचा डाव आहे, असे पाकिस्तानने या पत्रात म्हटले आहे. पाकच्या आरोपांना योग्य वेळी उत्तर देण्यात येईल असे भारतातर्फे सांगण्यात आले.