News Flash

पाकिस्तानी न्यूज चॅनेल हॅक, स्क्रीनवर झळकला भारतीय तिरंगा

वृत्तवाहिनीकडून चौकशीचा आदेश

पाकिस्तानमधील प्रसिद्ध वृत्तवाहिनी ‘डॉन’ हॅक करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. वृत्तवाहिनी हॅक केल्यानंतर स्क्रीनवर भारतीय तिरंगा झळकला. सोबतच स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या. वृत्तवाहिनी हॅक झाल्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ट्विटरला अनेकांनी हे व्हिडीओ, फोटो सोशल केले आहेत.

वृत्तवाहिनीवर जाहिरात सुरु असतानाच अचानक स्क्रीनवर भारतीय तिरंगा झळकला. आणि सोबत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या. दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. हा मेसेज किती वेळासाठी स्क्रीनवर होता यासंबंधी माहिती मिळू शकलेली नाही.

दरम्यान वृत्तवाहिनीकडून ट्विट करण्यात आलेलं असून याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याचं सांगितलं आहे.

चौकशीनंतर यासंबंधी मिळालेली माहिती दर्शकांना देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2020 10:07 pm

Web Title: pakistan news channel dawn hacked screen shows indian tricolour sgy 87
टॅग : Independence Day
Next Stories
1 परदेशी प्रवाशांना भारतात प्रवेश करताना पाळावे लागणार ‘हे’ नियम; नवी नियमावली जाहीर
2 अमित शाह यांना करोनाची लागण झाल्यानंतर राहुल गांधींचं ट्विट, म्हणाले…
3 “कोणत्याही राज्यावर भाषेची जबरदस्ती नाही”, नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणावरुन केंद्र सरकारचं स्पष्टीकरण
Just Now!
X