चीनने पाकिस्तानला चक्क अंडरवेअरपासून तयार केलेले मास्क पुरवले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची पाठराखण करणाऱ्या चीनने करोनाच्या संकटात एकप्रकारे पाकिस्तानची खिल्लीच उडवली आहे. पाकिस्तानच्या वृत्तवाहिन्यांपैकी एका वृत्तवाहिनीने चायनाने चुना लगा दिया अशी प्रतिक्रिया दिली आहे.

चीनने आम्हाला चांगल्या दर्जाचे N95 मास्क पुरवू असं आश्वासन दिलं होतं. मात्र त्यांनी पाठवलेले मास्क आले तेव्हा ते अंडरविअरपासून तयार करण्यात आलेले निकृष्ट दर्जाचे मास्क होते असं समोर आलं. यासंदर्भातलं ट्विट निवृत्त मेजर गौरव आर्य यांनीही केलं आहे.

जगभरात जसा करोनाचा धोका वाढतो आहे तसाच तो पाकिस्तानातही आहे. पाकिस्तानातही करोनाचे रुग्ण आहेत. चांगल्या दर्जाच्या N95 मास्कची पाकिस्तानला नितांत गरज आहे. अशात चीनने ज्या मास्कचा पुरवठा केला ते मास्क अंतर्वस्त्रांपासून तयार करण्यात आलेले आहेत आणि शिवाय निकृष्ट दर्जाचेही आहेत. त्यामुळेच चीनने चुना लावला अशी भावना पाकिस्तानातील न्यूज अँकरने बोलून दाखवली आहे.

पाकिस्तानाही करोनामुळे चिंता वाढली आहे. सिंध प्रांतात ८३९, खैबरमध्ये ३४३, बलुचिस्तानात १७५ तर गिलगिटमध्ये १९३ करोना रुग्ण सापडले आहेत. शुक्रवारपर्यंत पाकिस्तानात सापडलेल्या रुग्णांची संख्या २७०० च्या वर गेली आहे. तर आत्तापर्यंत ४० जणांचा करोनाची बाधा झाल्याने मृत्यू झाला आहे. अशात N95 या मास्कची सर्वाधिक गरज असताना आणि जे चीनकडून येतील असं वाटत असताना चीनने पाठवलेले मास्क निकृष्ट दर्जाचे आणि अंडरविअरपासून तयार करण्यात आलेले असल्याचं समोर आलं आहे.