18 September 2020

News Flash

नियंत्रण सुटल्याने विमान धावपट्टीवर उतरताना समुद्रात घुसले; सर्व ४७ प्रवाशी सुखरुप

विमान समुद्रात कोसळल्यानंतर एकाही प्रवाशाला गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र, पाण्यावर तरंगणाऱ्या या विमानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

एक प्रवाशी विमान धावपट्टीवर उतरण्याच्या तयारीत असताना अंदाज चुकल्याने थेट पॅसिफिक महासागरात जाऊन कोसळल्याची घटना शुक्रवारी येथील एका बेटावर घडली.

एक प्रवाशी विमान धावपट्टीवर उतरताना नियंत्रण सुटल्याने थेट पॅसिफिक महासागरात घुसल्याची घटना येथील एका बेटावर घडली. सुदैवाने यातील सर्व ४७ प्रवाशी सुखरुप वाचवण्यात आले आहेत. दक्षिण पॅसिफिक महासागरातील मायक्रोनेशिया या देशाच्या वेनो बेटावरील चुक आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही दुर्घटना घडली. हे विमान धावपट्टीच्या सुमारे १५० यार्ड पुढे जात जवळच्या समुद्रात घुसले.

Next Stories
1 Sabarimala Temple Verdict: महिलांच्या प्रवेशबंदीचे न्या. इंदू मल्होत्रांनी केले समर्थन
2 हिंदुत्ववादी संघटनेला हाताशी धरून अमरसिंह काढणार ‘आझम खान FIR यात्रा’
3 निवडणुकीपूर्वी सर्जिकल स्ट्राइकवरील भाजपाच्या राजकारणामुळे लष्कराचे अधिकारी नाराज
Just Now!
X