दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पूड फेकल्याचं प्रकरण अजून निवळलंही नसताना आज (मंगळवारी) केजरीवालांच्या जनता दरबारातून एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. या तरुणाकडे पिस्तुलातील जिवंत काडतूस सापडल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस आरोपी तरुणाकडे चौकशी करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद इमरान (वय – 39) असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे. तपासणीदरम्यान त्याच्या खिशात पिस्तुलगी गोळी सापडल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याच्यासोबत 12 अन्य इमाम आणि मौलवी हे देखील होते. हे सर्व दिल्ली वक्फ बोर्डमधील कर्मचाऱ्यांची पगारवाढ करावी अशी शिफारस करण्यासाठी जनता दरबारात गेले होते अशी माहिती आहे. मात्र, या प्रकरणामुळे पुन्हा एकदा दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 27, 2018 10:06 am