पेशावरमधील लष्कराच्या शाळेवर तालिबान्यांनी केलेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेला आणखी एक विद्यार्थी शनिवारी मरण पावला. त्यामुळे या हल्ल्यातील मृतांची संख्या आता १५३ झाली आहे.
सदर विद्यार्थ्यांचे नाव इशाक अमिन असे असून त्याला हल्ला झाला त्याच दिवशी अत्यंत गंभीर अवस्थेत लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. अमिनवर दोनदा शस्त्रक्रिया करण्यात आल्या मात्र त्या निष्फळ ठरल्या.
 इशाकचा भाऊ आमिर हाही या हल्ल्यात जखमी झाला असून त्याच्यावरही याच हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
जखमी विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात सरकारकडून निष्काळजीपणा होत असल्याचा आरोप अमिनचा भाऊ वकार याने केला आहे. त्यामुळे पंतप्रधान नवाझ शरीफ आणि खैबर प्रांताचे मुख्यमंत्री परवेझ खट्टक यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविण्याचा इशाराही वकारने दिला आहे.