पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत करोनास्थितीचा आढावा घेत आहेत. करोना संदर्भातील उपाययोजना आणि समस्या जाणून घेत आहेत. करोना स्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठका घेत असून प्रत्येक परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मणिपूर, त्रिपुरा आणि सिक्किमच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आणि परिस्थितीची माहिती घेतली होती. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांनी संवाद साधला होता. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाब, कर्नाटक, बिहार आणि उत्तराखंडमधील मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली.

गेल्या २४ तासात कर्नाटकात ४७,५६३, बिहारमध्ये १२,९४८, पंजाबमध्ये ९,०४२ आणि उत्तराखंडमध्ये ८,३९० रुग्णांची नोंद झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधत करोना स्थितीचा आढावा घेतला होता. महाराष्ट्र करोनाच्या दुसऱ्या लाटेविरुद्ध सक्षमपणे लढा देत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचं कौतुक केलं होतं.

दिल्लीत लॉकडाऊन पुन्हा वाढवला; मेट्रो सेवाही आठवडाभरासाठी बंद

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बिकट स्थिती आहे. अनेक राज्यांत करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काही राज्यांनी करोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. तर काही राज्यांनी कडक निर्बंध लादले आहेत. अपुऱ्या वैद्यकीय उपकरणांमुळे रुग्णांचे हाल होत असून आरोग्य यंत्रणेवरही ताण पडत आहे. देशातील या संपूर्ण परिस्थितीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आढावा घेत आहे. देशात शनिवारी ४ लाख ३ हजार ७३८ नागरिक करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. काहीसा दिलासादायक बाब म्हणजे याच कालावधीत देशभरात ३ लाख ८६ हजार ४४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. तर देशात सलग चौथ्या दिवशी चार हजारांहून अधिक मृत्यूची नोंद झाली आहे.

नागपूर : फळ विक्रेता डॉक्टर बनून कोविड रुग्णांवर करत होता उपचार

जगप्रसिद्ध ‘दी लॅन्सेट’ या वैद्यकीय क्षेत्रातील नियतकालिकाने करोना परिस्थिती हाताळण्यावरून मोदी सरकारला खडेबोल सुनावले आहेत.  १ ऑगस्टपर्यंत भारतात दहा लाख बळी जाण्याची शक्यता ‘दी इन्स्टिट्यूट फॉर दी हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन’ या संस्थेने दिलेल्या माहितीच्या आधारे ‘दी लॅन्सेट’च्या संपादकीयात दिली आहे.