प्रजासत्ताक दिनानिमित्त इंडिया गेट येथील अमर ज्योती जवान येथे प्रथम न जाता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४८ वर्षांची परंपरा मोडीत काढली. त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे जाऊन शहिदांना श्रद्धांजली वाहिली.  या राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे गेल्या वर्षी २५ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदी यांनीच उद्घाटन केले होते.

तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख अमर जवान ज्योती स्मारक येथे जाऊन स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनी शहिदांना श्रद्धांजली वाहतात. १९७२ साली इंडिया गेट येथे १९७१ च्या भारत-पाक युद्धातील शहिदांच्या स्मरणार्थ हे स्मारक उभारण्यात आले होते. यंदा प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सीडीएस अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सहभागी झाले.

त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ७१व्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर ध्वजारोहण केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्रीमंडळातील विविध मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते. ब्राझीलचे पंतप्रधान हे यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. दरम्यान, राजपथावर पथसंचालनाला सुरुवात झाली आहे.