पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ११ वाजता (PM Modis Mann ki Baat) रेडियो कार्यक्रम ‘मन की बात’च्या माध्यमातून देशातील नागरिकांशी संवाद साधणार आहे. आज सप्टेंबर महिन्याचा शेवटचा रविवार आहे. मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होतो. मन की बात कार्यक्रमाच्या ६९ व्या एडिशनामार्फत मोदी नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

पंतप्रधानांनी शनिवारी त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरुन ट्विट करत नागरिकांना आजचा ‘मन की बात’ कार्यक्रम एकण्याचं आवाहन केलं आहे. “यंदाच्या कार्यक्रमासाठी नागरिकांकाडून अनेक सल्ले प्राप्त झाले”, असं ट्विट त्यांनी केलं.

कोरोनाच्या या महामारीच्या काळात पंतप्रधान मोदी सतत जनतेशी संवाद साधत आहेत. आज ते पुन्हा देशवासियांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या विषयावर बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मन की बात या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी कृषी विधेयक, शेती आणि शेतकरी या विषयांवर बोलण्याची शक्यता आहे. यासोबतच करोना महामारी आणि भारत-चीन सीमावादावरही मोदी भाष्य करण्याची शक्यता आहे.