25 October 2020

News Flash

पंतप्रधान मोदींनी वाजपेयींची ‘ती’ कविता शेअर करत केलं दिवे लावण्याचं आवाहन

त्यांनी रविवारी लोकांना दिवे लावण्याचं आवाहन केलं आहे.

सध्या देशभरात करोनानं थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली आहे. यादरम्यान शुक्रवारी पंतप्रधानांनी व्हिडीओ संदेशाद्वारे देशाला संबोधित केलं. तसंच ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी सर्व दिवे बंद करून मेणबत्ती, टॉर्च किंवा मोबाईलचा फ्लॅश चालू करण्याचं आवाहन केलं होतं.

त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट करून माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आठवणं काढत त्यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि त्या व्हिडीओला आओ दीया जलाएं असं कॅप्शन दिलं आहे.

या व्हिडीओमध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे त्यांची ”आओ फिर से दीया जलाएं” कविता वाचत आहेत.

वाचा कविता :

आओ फिर से दिया जलाएं
भरी दुपहरी में अंधियारा
सूरज परछाई से हारा
अंतरतम का नेह निचोड़ें-
बुझी हुई बाती सुलगाएं
आओ फिर से दिया जलाएं

 

हम पड़ाव को समझे मंज़िल
लक्ष्य हुआ आंखों से ओझल
वर्त्तमान के मोहजाल में-
आने वाला कल न भुलाएं
आओ फिर से दिया जलाएं

आहुति बाकी यज्ञ अधूरा
अपनों के विघ्नों ने घेरा
अंतिम जय का वज़्र बनाने-
नव दधीचि हड्डियां गलाएं
आओ फिर से दिया जलाएं

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2020 4:06 pm

Web Title: pm narendra modi share video of former pm atal bihari vajpayee aao diya jalaye tweet jud 87
Next Stories
1 हे वागणं बरं नव्हं! एनजीओला फोन करुन जेवण मागवणाऱ्या कुटुंबाच्या घरी सापडला धान्यसाठा
2 चीननं पाकिस्तानला पुरवले अंडरवेअरपासून बनवलेले मास्क; चॅनेल म्हणतं ‘चुना लगा दिया’
3 Coronavirus: टप्प्याटप्प्यानं रेल्वे सेवा सुरु होणार; रेल्वेनं दिले संकेत
Just Now!
X