News Flash

मेहुल चोक्सीचं अपहरण करुन भारतात आणण्याचा डाव होता; वकिलाचा गंभीर आरोप

पोलीस असल्याचं सांगत आठ ते १० जणांनी मला मारहाण केली; मेहुल चोक्सीचा नवा आरोप

पोलीस असल्याचं सांगत आठ ते १० जणांनी मला मारहाण केली; मेहुल चोक्सीचा नवा आरोप (AP)

पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार ५०० कोटींचा चुना लावून पसार झालेल्या मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी भारताला अद्याप प्रतिक्षा करावी लागणार आहे. मेहुल चोक्सीने डोमिनिकामधील कोर्टात याचिका दाखल केली असून याशिवाय अजून एका प्रकरणावर सुनावणी सुरु आहे. यादरम्यान मेहुल चोक्सीने अँटिग्वा पोलिसांकडे अपहरण झाल्याचा दावा केला असून गंभीर आरोप केले आहेत.

मी कायदा पाळणारा माणूस, उपचारासाठी भारत सोडला; चोक्सीचा कोर्टात दावा

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, मेहुल चोक्सीने अँटिग्वा पोलिसांकडे केलेल्या आरोपात म्हटलं आहे की, “८ ते १० जणांनी अँटिग्वा पोलीस असल्याचं सांगत मला अमानुषपणे मारहाण केली. मी अजिबात शुद्धीत नव्हतो. त्यांनी माझा फोन, घड्याळ आणि पाकिट काढून घेतलं. मला लुटण्याचा हेतू नसल्याचं सांगत त्यांनी माझे पैसे परत केले”.

अपहरणामागचा नेमका उद्देश काय?
मेहुल चोक्सीतर्फे कायदेशीर लढा लढणारे अॅटर्नी जनरल जस्टीन सिमन यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हटलं आहे की, “मेहुल चोक्सीला डोमिनिकामध्ये आणून कोणताही गाजावाजा करता भारतात नेण्याचा योजना असावी असं मला वाटतं. या योजनेत सहभागी काही अधिकाऱ्यांनाच याची माहिती असावी. सुदैवाने डोमिनिकात अटकेची कारवाई झाल्यानंतर मला माहिती मिळाली आणि मी चार वकिलांशी संपर्क साधला. त्यामधील एक जण पोलीस ठाण्यात दगेला. त्याला मी अँटिग्वामधील वकील म्हणून पाठवलं होतं. पण त्याला भेटीसाठी नकार देण्यात आला. यावेळी त्याने गोंधळ केला असताना तिथेच जेलमध्ये असणाऱ्या मेहुल चोक्सीनेही आवाज दिला. यानंतरच आम्ही कोर्टात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली”.

मेहुल चोक्सीला आणण्यासाठी गेलेले भारतीय अधिकारी रिकाम्या हाती परतले; मोदी सरकारची निराशा

दरम्यान मेहुल चोक्सीला डोमिनिकातून भारतात आणण्यास गेलेले विविध यंत्रणांचे पथक जवळपास एका आठवड्याच्या प्रतीक्षेनंतर चोक्सीला न घेताच कतार एअरवेजच्या खासगी विमानाने मायदेशी परतलं आहे.

डोमिनिकातील उच्च न्यायालयाने चोक्सी याच्या हेबियस कॉर्पस याचिकेवरील सुनावणी तहकूब केल्यानंतर हे पथक तेथून निघाले. डोमिनिकातील मेलविल हॉल विमानतळावरून खासगी विमानाने उड्डाण केलं आणि ते माद्रिदच्या दिशेने रवाना झाले. सीबीआयच्या उपमहानिरीक्षक शारदा राऊत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने चोक्सी याला परत आणण्यासाठी सात दिवस प्रतीक्षा केली. चोक्सी याच्या हेबियस कॉर्पस याचिकेवरील सुनावणी पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2021 4:18 pm

Web Title: pnb scam mehul chowki attorney general justin simon dominicia antigua sgy 87
Next Stories
1 मुलांवर Covaxin लशीच्या चाचणीसाठी एम्समध्ये स्क्रिनिंग सुरू, जाणून घ्या प्रक्रिया
2 बाटलीपायी नवरी गेली…! नशेच्या धुंदीत नवरा लग्नमंडपात पोहोचला अन्…
3 मोबाईल सर्व्हिस सेंटरमधून विद्यार्थिनीचे नग्न फोटो शेअर केल्याचं प्रकरण; अ‍ॅपलला मोजावे लागले कोट्यवधी डॉलर्स!
Just Now!
X