News Flash

नीरव मोदी हाजिर हो! विशेष न्यायालयानं बजावले समन्स, अन्यथा मालमत्तेवर येणार टाच!

PNB घोटाळ्याप्रकरणी विशेष न्यायालयाने नीरव मोदीविरोधात समन्स जारी केले आहेत.

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील वाँटेड आरोपी नीरव मोदी याच्या गळ्याभोवती आता कायदा व्यवस्थेचा फास अधिकाधिक आवळू लागला आहे. काही दिवसांपूर्वी ब्रिटनमधील स्थानिक न्यायालयाने नीरव मोदीला भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी दिली असून प्रत्यार्पणाविरोधातली त्याची याचिका फेटाळून लावली आहे. आता मुंबईतील विशेष न्यायालयाने नीरव मोदीच्या नावे समन्स बजावले असून त्याला पुढील महिन्यात ११ जून रोजी न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नीरव मोदी हजर राहण्यात अपयशी ठरल्यास फरार आर्थिक गुन्हेगार कायद्यानुसार न्यायालय कारवाईचे आदेश देईल, असं देखील या नोटिशीमध्ये नमूद केलं आहे. PNB घोटाळा उघड झाल्यापासून नीरव मोदी भारताबाहेर पळून गेला असून सध्या तो ब्रिटनमध्ये आहे.

प्रत्यार्पणाविरोधात नीरव मोदीचा अर्ज

भारतात प्रत्यार्पण न करण्यासंदर्भात नीरव मोदीने ब्रिटनच्या स्थानिक नायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने सुनावणीअंती फेटाळून लावत नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा केला होता. त्यावर ब्रिटनच्या गृहमंत्र्यांची देखील मान्यता मिळाली होती. मात्र, ब्रिटनच्या कायद्यानुसार असा निर्णय पारित झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत गुन्हेगाराला उच्च न्यायालयात अपील करण्याची परवानगी मागणारा अर्ज करता येतो. त्याप्रमाणे नीरव मोदीने असा अर्ज केला असून त्यावर लवकरच सुनावणी होणं अपेक्षित आहे.

ईडीचे नीरव मोदीवर आरोप!

दरम्यान, मुंबईतील आर्थिक गुन्हेसंबंधी विशेष न्यायालयाने आता नीरव मोदीला ‘तुमची मालमत्ता जप्त का केली जाऊ नये?’ अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. विशेष न्यायाधीश व्ही. सी. बर्डे यांनी ही नोटीस बजावली आहे. डिसेंबर २०१९मध्ये विशेष न्यायालयाने नीरव मोदीला फरार आर्थिक गुन्हेगार जाहीर केलं होतं. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या ईडीनं दाखल केलेल्या याचिकेवर निकाल देताना न्यायालयाने हे जाहीर केलं होतं. ईडीनं या याचिकेसोबत नीरव मोदीच्या मालमत्तांची यादी दिली असून आता त्याच मालमत्तांवर टाच येण्याची शक्यता आहे.

नीरव मोदीचं प्रत्यार्पण पुन्हा लांबणार? आता ब्रिटनच्या उच्च न्यायालयात केली याचिका!

नीरव मोदीच्या कुटुंबीयांनाही नोटीस!

अशीच नोटीस नीरव मोदीची पत्नी अमी, बहीण पूर्वी आणि बहिणीचे पती मयांक मेहता यांना देखील बजावण्यात आली आहे. ईडीनं नीरव मोदीवर आरोप केला आहे की त्याने त्याचा काका मेहुल चोक्सीसोबत मिळून लेटर्स ऑफ अंडरस्टँडिंगच्या माध्यमातून पंजाब नॅशनल बँकेची तब्बल १४ हजार कोटींची फसवणूक केली आहे. २०११ च्या मार्च महिन्यापासून PNB च्या मुंबई शाखेनं अशा प्रकारे नीरव मोदीशी संबंधित कंपन्यांना चुकीच्या पद्धतीने लेटर्स ऑफ अंडरस्टँडिंग दिल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 5:39 pm

Web Title: pnb scam nirav modi summoned by special court on ed plea property attachment pmw 88
टॅग : Ed,Scam
Next Stories
1 “लस तर नाही, मग त्या कॉलरट्युनचा त्रास कशाला?” उच्च न्यायालयाने केंद्राला सुनावलं!
2 देशातील १८ राज्यात करोना रुग्णवाढीचा दर २० टक्क्यांहून अधिक
3 Corona : छत्तीसगड सरकारनं नवीन विधानभवन, राजभवनाचं बांधकाम थांबवलं!
Just Now!
X