विष पेरण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करू नका असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले ज्यानंतर कवी आणि टीकाकार संपत सरल यांनी ट्विट करत याला उत्तर दिले आहे. अक्षय कुमार जगात कुठेही राहिला त्याने भारतीय नागरिकत्त्व सोडू नये, विजय मल्ल्याने वेळेत कर्ज परत करावे, अमित शाह यांनी मॉर्निंग वॉकसाठी वेळेवर जावे, गायीपेक्षा माणसातले माणूसपण योगी आदित्यनाथांनी ओळखावे, पत्रकार सुधीर चौधरींनी दलाली सोडावी, दुसऱ्याचे वडिल म्हणजेच आपले वडिल असे संबित पात्रा यांनी म्हणणे सोडावे या आशयाचे खोचक ट्विट करत संपत सरल यांनी मोदींच्या आवाहनावर टीका केली आहे. या ओळींमधून ज्या व्यक्ती जशा नाहीत त्यांनी ते आचरणात आणावे असा सल्ला संपत सरल यांनी दिला आहे.
विश्व में कहीं भी रहें, नागरिकता न छोड़ें भारतीय- अक्षय कुमार<br />समय पर लोन चुकाएँ- विजय माल्या
मॉर्निंग वॉक पर समय से जाएं- अमितशाह
गाय से ज्यादा मनुष्य को महत्व दें- योगी
दलाली न करें पत्रकार- सुधीर चौधरी
हिंदू मुस्लिम डिबेट में न उलझें- सरदाना
दूसरे के बाप को अपना न कहें- पात्रा https://t.co/ou7FTQQlqY
— Sampat Saral (@Sampat_Saral)
संपत सरल हे मोदींचे टीकाकार म्हणून ओळखले जातात. याआधीही त्यांनी नोटाबंदी, मोदींचे विदेश दौरे, स्वच्छ भारत अभियान यावर शेलक्या शब्दांमध्ये टीका केली आहे. आता पुन्हा एकदा त्यांचा हा ट्विट समोर आला आहे. ज्याची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते आहे.