निदहास चषक तिरंगी मालिकेतील सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या चार जणांना हैदराबादमधून अटक करण्यात आलेली आहे. हैदराबाद पोलिसांच्या विशेष पथकाने सोमवारी केलेल्या छापेमारीत चार जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. या छापेमारीदरम्यान पोलिसांना अब्दीस आणि कुलसमपुरा भागात तिरंगी मालिकेतील सामन्यांवर सट्टा लावला जात असल्याचं आढळून आलं. या कारवाईत पोलिसांनी ७ लाख ७२ हजार रोकड, २ टीव्ही सेट, २ सेट ऑफ बॉक्स, १० मोबाईल आणि १ कॅल्क्युलेटर एवढा मुद्देमाल जप्त केला आहे.