News Flash

दिवाळीत सामान्यांचं ‘दिवाळं’! गॅस सिलिंडर महागले

विनाअनुदानित सिलिंडरच्या किंमतीत ६० रुपयांची तर अनुदानित सिलिंडरच्या दरात २.९४ पैशांची वाढ

संग्रहित छायाचित्र

मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होताना दिसत आहेत. ही अल्प घसरण असली तरी जनतेला यातून थोडाफार दिलासा मिळतोय. परंतु, दरवाढीचा फटका आता सर्वसामान्यांच्या स्वयंपाक घराला बसणार आहे. नोव्हेंबर महिन्यात विनाअनुदानित सिलिंडरच्या किंमतीत ६० रुपयांची वाढ झाली आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यातही ५९ रुपयांची वाढ झाली होती. त्याचबरोबर अनुदानित घरगुती सिलिंडरच्या दरात २.९४ पैशांची वाढ नोंदवण्यात आली आहे. जून महिन्यापासून गॅस दरांमध्ये झालेली हा सलग सातवी वाढ आहे.

नोव्हेंबर महिन्यात दिल्लीमध्ये विनाअनुदानित सिलिंडरची किंमत ८८० रुपये असेल. विशेष म्हणजे अनुदानित सिलिंडरवर देण्यात येणारी सूट सरकारने नोव्हेंबर २०१८ मध्ये वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता ग्राहकांच्या खात्यात ४३३.६६ रुपये जमा होतील. तर ऑक्टोबर २०१८ मध्ये ही रक्कम ३७६.८० पैसे इतकी होती.

इंडियन ऑइलने सप्टेंबरमध्ये निवेदन प्रसिद्ध केले होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत वाढल्यामुळे आणि विदेशी मुद्रा विनिमय दरातील चढ-उतार हे सिलिंडरच्या दर वाढीस कारणीभूत असल्याचे म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2018 8:49 am

Web Title: prices of non subsidized and subsidized cylinders hiked from nov 2018
Next Stories
1 आधी सीबीआयला आपले घर ठीक करु द्या: सुप्रीम कोर्ट
2 पेट्रोल १६ पैशांनी स्वस्त, डिझेलचे दर जैसे थे
3 दर्दे दिल, दर्दे जिगर दिल्लीमें जगाया ‘आप’ने म्हणत गंभीरचा केजरीवालांवर निशाणा
Just Now!
X