05 July 2020

News Flash

आयसिसवर हल्ल्यासाठी पाठिंबा द्या

सीरियातील इस्लामिक स्टेटवर हवाई हल्ले चढवण्याच्या कारवाईत आम्हाला पाठिंबा द्यावा

ब्रिटनने सीरियाविरुद्धच्या हवाई हल्ल्यांमध्ये सहभागी होण्याविरुद्ध ‘स्टॉप दि वॉर कोअ‍ॅलिशन प्रोटेस्ट मूव्हमेंट’तर्फे हजारो लोकांनी शनिवारी लंडनमध्ये निदर्शने केली.

ओलांद यांचे ब्रिटिश खासदारांना आवाहन

सीरियातील इस्लामिक स्टेटवर हवाई हल्ले चढवण्याच्या कारवाईत आम्हाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी ब्रिटिश खासदारांना केले आहे.
सीरियातील जिहादी गटांवर फ्रान्स करत असलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये ब्रिटनने सहभागी व्हावे, याबाबत ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी गुरुवारी खासदारांपुढे आपले म्हणणे मांडले असून, या मुद्दय़ावर पुढील आठवडय़ात ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मतदान होण्याची अपेक्षा आहे. दोन आठवडय़ांपूर्वी आयसिसने पॅरिसमध्ये केलेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर या मुद्दय़ाला होणारा विरोध कमजोर होत आहे.
सीरियातील हवाई हल्ल्यांमध्ये भाग घेण्याबाबत आपण संसदेशी विचारविनिमय करणार असल्याचे कॅमेरून यांनी मला सांगितले आहे. यासाठ ‘हाऊस ऑफ कॉमन्स’चे मन वळवण्याची त्यांना खात्री आहे, असे ओलांद यांनी माल्टा येथील राष्ट्रकुल परिषदस्थळी वृत्तसंस्थेला सांगितले.
पुढील आठवडय़ात होणाऱ्या मतदानासाठी संख्याबळ तोडीचे असले, तरी खासदारांची या प्रस्तावाला पाठिंबा देण्याची तयारी दिसते आहे. तसे झाल्यास काही दिवसातच ब्रिटनचे सीरियावर हल्ले सुरू होतील. मात्र, ब्रिटनमधील नागरिकांनी शनिवारी हवाई हल्ले करण्याविरोधता निदर्शने करून आपला विरोध दर्शवला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2015 7:04 am

Web Title: protest against isis
टॅग Isis
Next Stories
1 जलमार्ग कोळसा वाहतुकीमुळे १० हजार कोटींची बचत -गडकरी
2 सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा!
3 हरयाणात महिला अधिकाऱ्याची मंत्र्यांशी खडाजंगीनंतर बदली
Just Now!
X