‘पनामा पेपर्स’चा गौप्यस्फोट केल्याबद्दल गौरव; अमेरिकेतील ‘मॅकक्लॅची’ व ‘मियामी हेरल्ड’चाही समावेश

‘पनामा पेपर्स’च्या माध्यमातून जगातील विविध राजकारणी आणि उद्योगपतींच्या बेहिशेबी गुंतवणुकीला वाचा फोडणाऱ्या ‘इंटरनॅशनल कन्सॉर्टियम ऑफ इनव्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट्स’ (आयसीआयजे) या संघटनेला आणि मॅकक्लॅची व मियामी हेरल्ड या अमेरिकी प्रसारमाध्यमांना यंदाचा प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे.

मायकेल गिफ्किन्स पुरस्कारांच्या नामांकन यादीत श्रिया भागवत
olympic sports bodies criticize on cash prizes by athletics organizations
अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या रोख पारितोषिकाच्या भूमिकेला वाढता विरोध
Cash prize from Paris Olympics to gold medal winning athletes
सुवर्णपदकविजेत्या अ‍ॅथलेटिक्सपटूंना पॅरिस ऑलिम्पिकपासून रोख पारितोषिक! जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेचा निर्णय
LK Advani Bharat Ratna
राष्ट्रपतींनी लालकृष्ण अडवाणींच्या घरी जाऊन दिला ‘भारतरत्न’, पंतप्रधान मोदीही उपस्थित

जर्मनीतील ‘सुददॉइश झायटुंग’ या वर्तमानपत्राच्या बॅस्टियन ओबेरमेयर आणि फ्रेडरिक ओबेरमेयर या दोघा पत्रकारांना २०१५ सालच्या सुरुवातीला ‘जॉन डो’ नावाच्या सूत्राकडून माहितीचा खजिना मिळाला. त्यात पनामा येथून कार्यरत ‘मोझ्ॉक फॉन्सेका’ नावाच्या बोगस कंपन्या स्थापन करून देऊन बेहिशेबी गुंतवणूक करणाऱ्या कंपनीची लाखो कागदपत्रे होती. जर्मन वृत्तपत्राने हा ऐवज ‘आयसीआयजे’च्या हवाली केला. पत्रकारांच्या प्रसारमाध्यमांच्या या आंतरराष्ट्रीय संघटनेने ही माहिती त्यांच्याशी संलग्न असलेल्या जगभरातील १०० हून अधिक प्रसारमाध्यमांमध्ये वाटली. त्यात ब्रिटनमधील बीबीसी, द गार्डियन यांसारख्या प्रतिष्ठित माध्यमसमूहांसह भारतातील ‘द इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तसमूहाचाही समावेश होता. जगाच्या सहा खंडांवर विखुरलेल्या सुमारे ३०० पत्रकारांनी आपापल्या देशांसंबंधी कागदपत्रांची कसून छाननी केली आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील एक मोठा गैरप्रकार उघडकीस आला. एप्रिल २०१६ मध्ये एकाच दिवशी जगातील या सर्व प्रसारमाध्यमांनी या प्रकरणाला प्रसिद्धी दिली. जगभरातील अनेक राजकारणी, उद्योगपती आणि बडय़ा नागरिकांनी पनामा येथील या कंपनीच्या माध्यमातून बोगस कंपन्या स्थापन करून करोडो रुपयांच्या बेहिशेबी उलाढाली केल्या होत्या. जगाच्या इतिहासातील एकत्रित शोधपत्रकारितेचे हे सर्वात मोठे उदाहरण होते.

या प्रकरणाने जागतिक पातळीवर मोठा गदारोळ माजला. पनामा पेपर्समध्ये नामोल्लेख असल्याच्या कारणाने ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून आणि आइसलँडचे पंतप्रधान सिग्मंदूर डॅव्हियो गुनलॉगसन यांना राजीनामा द्यावा लागला. अर्जेटिनामाध्ये सरकारविरोधी निदर्शने झाली. अझरबैजानमध्ये या प्रकरणापासून जनतेचे लक्ष इतरत्र वेधण्यासाठी एक छोटे युद्ध झाले. या प्रकरणात रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांना २ अब्ज डॉलरचा लाभ झाल्याचे दिसून येत होते. तेथेही सरकारविरोधी राळ उडाली. भारतासह अन्य देशांतही या प्रकरणाचे मोठे पडसाद उमटले. मोझ्ॉक फॉन्सेका कंपनीचे संस्थापक जुर्गन मोझ्ॉक आणि रॅमन फॉन्सेका यांना अटक झाली.

  •  कोल्सन व्हाइटहेड यांच्या ‘अंडरग्राऊंड रेलरोड’ या कादंबरीला ‘फिक्शन’ वर्गातील पुलित्झर पुरस्कार. याच पुस्तकाला यंदाचा राष्ट्रीय पुस्तक पुरस्कारही मिळाला होता.
  • ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ला तीन पुरस्कार
  •  ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ आणि ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ला प्रत्येकी एक पुरस्कार