News Flash

नीरव मोदी प्रकरणात सीबीआय घेणार इंटरपोलची मदत

नीरव मोदीविरोधात डिफ्यूजन नोटीस जारी करावी, अशी विनंती सीबीआयने इंटरपोलला केली

नीरव मोदी (संग्रहित छायाचित्र)

पंजाब नॅशनल बँकेची हजारो कोटी रुपयांची फसवणूक करुन परदेशात पळालेला हिरे व्यापारी नीरव मोदीच्या अटकेसाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) आता इंटरपोलची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. नीरव मोदीविरोधात डिफ्यूजन नोटीस जारी करावी, अशी विनंती सीबीआयने इंटरपोलला केली आहे.

पंजाब नॅशनल बँकेतील ११ हजार ४०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यात केंद्र स्थानी असलेला नीरव मोदी १ जानेवारीलाच देश सोडून पळून गेल्याचे उघड झाले आहे. त्याची पत्नी अमी मोदी, नातेवाईक मेहुल चोकसी हे देखील परदेशात निघून गेले आहेत. घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने नीरव मोदी व त्याच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ईडीनेही या प्रकरणात गुन्हा दाखल करत चौकशीला सुरुवात केली आहे. नीरव मोदीचे देशभरातील कार्यालये, निवासस्थानी व शो रुम्सवर छापे घालण्यात आले. जवळपास ५, १०० कोटी रुपयांचे हिरे, दागिने व सोने जप्त करण्यात आले. सीबीआयने या प्रकरणात लूक आऊट नोटीसही जारी केली आहे.

नीरव मोदी परदेशात पळून गेल्याने सीबीआयने इंटरपोलकडे धाव घेतली आहे. नीरव मोदी व त्याच्या कुटुंबीयांविरोधात डिफ्यूजन नोटीस जारी करण्याची विनंती सीबीआयने केली आहे. डिफ्यूजन नोटीसमुळे नीरव मोदीचा ठावठिकाणा मिळू शकेल. यात सीबीआयच्यावतीने ‘इंटरपोल’मधील सदस्य देशांना नीरव मोदीची माहिती दिली जाईल आणि या आधारे त्याची माहिती मिळू शकेल. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत नीरव मोदी कोणत्या देशात आहे हे स्पष्ट होईल, असे सूत्रांनी सांगितले.

नीरव मोदी व त्याचा भाऊन नीशल मोदी हे दोघे १ जानेवारी रोजी भारतातून पळाले. तर त्याची पत्नी अमी मोदी ६ जानेवारी रोजी आणि मामा मेहुल चोकसी ४ जानेवारी रोजी परदेशात पळाले. नीशल मोदी हा बेल्जियम नागरिक आहे. तर मेहुल चोकसी हे गीतांजली ज्वेलरीचे प्रोमोटर आहेत. नीरव मोदीचा जन्म बेल्जियममध्ये झाला असून त्याचे वडिल देखील हिरे व्यापारीच होते. न्यूयॉर्कपासून ते मकाऊपर्यंत नीरव मोदीच्या ब्रँडचे शो रुम्स आहेत. त्याची पत्नी अमी मोदी ही मूळची अमेरिकेची आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 16, 2018 12:12 pm

Web Title: punjab national bank fraud cbi approached interpol request for diffusion notice to locate nirav modi
टॅग : Cbi
Next Stories
1 सोन्याचे कानातले चोरण्यासाठी चोरट्याने महिलेचे कान फाडले
2 Cauvery Water Verdict : कावेरी वाद: नदीवर राज्यांचा अधिकार नाही: सुप्रीम कोर्ट
3 काश्मीरमध्ये दहशतवादी संघटनांमध्ये वर्चस्वाची लढाई; काय होणार परिणाम जाणून घ्या?
Just Now!
X