News Flash

पँटसारखीच संघाची विचारसरणीही सर्वसमावेशक करू; लालूप्रसाद यादवांची उपरोधिक टीका

२०१९च्या लोकसभा निवडणुकांनंतर संघाला पुन्हा हाफचड्डी घालावी लागेल

Lalu Prasad Yadav : ते (भाजप) आम्हाला घाबरले आहेत. आता ते ममता बॅनर्जी आणि नवीन पटनाईकसारख्या नेत्यांविरोधात सीबीआयसारख्या तपास यंत्रणांचा दुरूपयोग करत आहेत, असा आरोप केला.

विजयादशमीच्या मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) बदललेल्या गणवेशावरून राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी टिप्पणी केली आहे. अखेर आम्ही आरएसएसला फुल पँट घालायला भाग पाडलेच. राबडी देवी बरोबर बोलत असत की, या लोकांना संस्कृतीचे ज्ञान नाही, संघातील म्हाताऱ्या लोकांनाही इतक्या लोकांसमोर हाफ चड्डी घालायला लाज वाटत नाही. मात्र, आम्ही पिच्छा पुरवल्यामुळे संघाने हाफ पँटची फूल पँट केली. आम्ही जशी त्यांची पँट ‘फूल’ केली तशी त्यांची बुद्धीही ‘फूल’ करू. त्यांची पँटच नाही तर विचारसरणीच बदलू. त्यांना हत्यारे टाकायला लावू. समाजात विष पसरू देणार नाही, असे लालूप्रसाद यादव यांनी ट्विटरवरील संदेशात म्हटले आहे. संघ कामात अधिकाधिक लोकांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशातून यंदापासून संघाच्या गणवेशामध्ये हाफपँटऐवजी फुल पॅंट असा बदल करण्यात आली होता. त्याला प्रतिसाद देत अनेक युवा स्वयंसेवकांनी मोठय़ा प्रमाणात नव्या गणवेशाची खरेदी केली आणि संपूर्ण गणवेशासह ते संचलनात सहभागी झाले होते. तरूणांसोबत अनेक ज्येष्ठ स्वयंसेवकांनीही नव्या गणवेशासह संचलनात सहभाग नोंदविला. या गणवेश बदलाविषयी स्वयंसेवकांना औत्सुक्य होते. तर, ज्येष्ठ स्वयंसेवकांनी हा बदल सहजपणाने स्वीकारल्याचे दिसून आले.
काही महिन्यांपूर्वी लालूप्रसाद यांनी संघावर अशाचप्रकारची टीका केली होती. सध्या भाजपची सत्ता असल्यामुळे संघाने फूल पँट घातली आहे. मात्र, २०१९च्या लोकसभा निवडणुकांनंतर त्यांना पुन्हा हाफचड्डी घालावी लागेल, असा टोला लालूप्रसाद यांनी भाजपला लगावला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2016 12:09 pm

Web Title: rabri devi forced rss to change uniform lalu prasad yadav 2
Next Stories
1 व्हॉट्सअपवर गोमांसावर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या मुस्लिम युवकाचा पोलीस कोठडीत मृत्यू
2 प्रेमभंगाचा सूड उगवण्यासाठी ‘तिने’ प्रियकराच्या घरात ठेवले बॉम्ब
3 पंतप्रधान नरेंद्र मोदी १८ x ७ ऑनड्युटी; अडीच वर्षात एकही सुट्टी नाही
Just Now!
X