एकूण संपत्तीच्या ७३ टक्के संपत्ती एक टक्का भारतीयांकडे कशी याची माहिती दावोसमधील लोकांना द्या, असा उपरोधिक सल्ला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे.

ऑक्सफॅम अहवालात एक टक्का भारतीयांकडे ७३ टक्के संपत्तीचे केंद्रीकरण झाल्याची माहिती  देण्यात आली होती. या अहवालाच्या बातमीसह राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवरून उपरोधिक सल्ला दिला. ‘प्रिय पंतप्रधान, स्वित्र्झलडमध्ये तुमचे स्वागत! भारतातील संपत्तीच्या केंद्रीकरणाची माहिती दावोसमध्ये देणार का? मी सोबत अहवाल पाठवत आहे.’ असे ट्विट राहुल यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ परिषदेसाठी दावोसमध्ये गेले आहेत. मोदी यांचे सरकार श्रीमंतांसाठीच काम करत असल्याचा आरोपही राहुल यांनी केला आहे.