26 November 2020

News Flash

ICICI बँकेच्या CEO चंदा कोचर यांच्या दीराला देशाबाहेर जाताना मुंबई विमानतळावर घेतले ताब्यात

सीबीआयने राजीव कोचर यांच्याविरोधात लूक आऊट सक्युर्लर जारी केले आहे. त्यामुळे त्यांना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर देशाबाहेर जाण्यापासून रोखण्यात आले. आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉन समूहाला २०१२ मध्ये

आयसीआयसीआय बँकच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ चंदा कोचर यांचे दीर राजीव कोचर आज परदेशात चालले असताना मुंबई विमानतळावर इमिग्रेशन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले व सीबीआयकडे सोपवले. त्यानंतर सीबीआयने राजीव कोचर यांची व्हिडिओकॉन समूहाबरोबर झालेल्या आर्थिक व्यवहारासंबंधी त्यांची चौकशी केली.

सीबीआयने राजीव कोचर यांच्याविरोधात लूक आऊट सक्युर्लर जारी केले आहे. त्यामुळे त्यांना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर देशाबाहेर जाण्यापासून रोखण्यात आले. आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉन समूहाला २०१२ मध्ये ३,२५० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. त्याप्रकरणी सीबीआयने आधीच काही आयसीआयसीआय बँकेच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे.

या आर्थिक व्यवहाराच्या कागदपत्रांचा आम्ही अभ्यास करत आहोत. त्यात काही चुकीचे घडल्याचा पुरावा सापडला तर आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ चंदा कोचर तसेच त्यांचे पती दीपक कोचर यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाईल असे सीबीआयने सांगितले.

व्हिडिओकॉन समूहाला आयसीआयसीआय बँकेने ३२५० कोटी रुपयांचे कर्ज दिल्याचे प्रकरण ‘इंडियन एक्स्प्रेस’ने २९ मार्च रोजी उघड केले होते. व्हिडिओकॉन समूह व त्याच्या प्रवर्तकांना आयसीआयसीआय बँकेने दिलेल्या कर्जाबाबतची तक्रार ‘एसएफआयओ’ कार्यालयाच्या मुंबई शाखेला यंदाच्या फेब्रुवारीमध्येच प्राप्त झाली होती. तक्रारीत आर्थिक गैरव्यवहारांची साशंकता व्यक्त करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. व्हिडिओकॉन समूहाने २००८मध्ये दीपक कोचर यांच्या सहकार्याने नू-पॉवर कंपनी स्थापली. दीपक कोचर हे आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख चंदा कोचर यांचे पती आहेत. आयसीआयसीआयकडून कर्जपुरवठा झाल्याने दुहेरी हितसंबंधांचा मुद्दा उपस्थित होतो हा प्रमुख आक्षेप आहे. पुढे व्हिडिओकॉन समूहाला कर्जाच्या बहुतेक हिश्श्याची परतफेड करता आलेली नाही, त्यामुळे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2018 7:52 pm

Web Title: rajiv kochhar detained at mumbai airport
Next Stories
1 रेपो रेट ‘जैसे थे’, कर्जदारांना दिलासा नाहीच
2 उद्योगक्षेत्राला दिलासा नाहीच, RBI कडून व्याजदर ‘जैसे थे’
3 तीन वर्षांत सरकारी बँकांच्या २.४ लाख कोटींच्या कर्ज रकमेवर पाणी!
Just Now!
X