सार्क सदस्य राष्ट्रांच्या गृह मंत्र्यांच्या नेपाळमध्ये होत असलेल्या परिषदेवेळी पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह भेटणार नसल्याचे गृह मंत्रालयाकडून सोमवारी स्पष्ट करण्यात आले. सार्क शिखर परिषदेमध्ये राजनाथसिंह पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांना भेटणार असल्याची चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
दहशतवादी कारवाया आणि चर्चा दोन्ही एकाचवेळी होऊ शकत नाही, असे राजनाथसिंह यांचे स्पष्ट मत असल्याचे गृह मंत्रालायने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. पाकिस्तानकडून होणार दहशतवाद थांबत नाही, तोपर्यंत कोणतीही चर्चा होऊ शकत नाही, असे मंत्रालयाने स्पष्ट केले.
राजनाथसिंह येत्या १८ आणि १९ सप्टेंबरला नेपाळला जात आहेत. सार्क देशांतील गृहमंत्री नेपाळमध्ये होणाऱया परिषदेत सुरक्षेच्या प्रश्नांवर चर्चा करणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 1st Sep 2014 रोजी प्रकाशित
दहशतवाद थांबवल्याशिवाय पाकशी चर्चा नाही – राजनाथसिंह
नेपाळमध्ये होत असलेल्या सार्क सदस्य राष्ट्रांच्या गृह मंत्र्यांच्या परिषदेवेळी पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह भेटणार नसल्याचे गृह मंत्रालयाकडून सोमवारी स्पष्ट करण्यात आले.
First published on: 01-09-2014 at 11:45 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajnath has no plans to meet pak counterpart