News Flash

धक्कादायक! धावत्या बसमध्ये क्लीनरने नऊ वर्षांच्या मुलीवर केला बलात्कार

गुन्हेगारांना कायद्याचा अजिबात धाक राहिलेला नसून देशभरात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास खासगी स्लीपर कोच बसमध्ये ही धक्कादायक घटना

प्रातिनिधिक छायाचित्र

गुन्हेगारांना कायद्याचा अजिबात धाक राहिलेला नसून देशभरात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. गुजरातच्या छोटा उदयपूर जिल्ह्यातील पावी जेतपूर तालुक्यात धावत्या बसमध्ये एका नऊ वर्षाच्या मुलीवर क्लीनरने बलात्कार केला. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास खासगी स्लीपर कोच बसमध्ये ही धक्कादायक घटना घडली.

पीडित मुलगी तिच्या कुटुंबासोबत पावी जेतपूर तालुक्यातील भिनडोल गावात लग्नासाठी चालली होती. मुलीच्या आजोबांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्यांनी चिंचोड गावात रात्री ९.३० च्या सुमारास बस पकडली. कुटुंबिय पुढच्या सीटवर बसले होते. मुलगी मागच्या बाजूला असलेल्या स्लीपर केबिनमध्ये जाऊन बसली होती. मध्यरात्रीच्या सुमारास बस रतनपूर गावाजवळून जात असताना स्लीपर केबिनमधून कोणीतरी दरवाजा ठोकत असल्याचा आवाज मुलीच्या काकांच्या कानावर ऐकू पडला.

त्यांनी दरवाजा उघडला असता मुलीसोबत बसचा क्लीनर विष्णू कोळी तिथे होता. क्लीनरने मुलीचे लैंगिक शोषण केल्याचे समजल्यानंतर बसमध्ये एकच गोंधळ, आरडाओरडा सुरु झाला. चालकाने गाडीचा वेग कमी केल्यानंतर विष्णू कोळी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन तिथून पसार झाला. जेव्हा मुलीला याबद्दल विचारले तेव्हा तिने सांगितले कि, कोली जबरदस्तीने केबिनमध्ये शिरला व त्याने दरवाजा बंद केला.

जेव्हा मी मदतीसाठी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने माझे तोंड बंद करुन बलात्कार केल्याचे तिने सांगितले. गाडी वेगात पळत असल्याने बाहेर बसलेल्या कोणालाही तिचा आवाज ऐकू आला नाही. हे कुटुंब लग्नसोहळयासाठी चालले होते. लग्नात कुठली बाधा नको म्हणून त्यांनी लगेच तक्रार दाखल केली नाही. पण नंतर त्यांनी पावी जेतपूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. जेतपूर पोलिसांनी विष्णू कोळीला अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2018 8:02 am

Web Title: rape in moving bus
टॅग : Gujarat
Next Stories
1 ऐतिहासिक ! बॉर्डर ओलांडून किम जोंग दक्षिण कोरियात पोहोचला, दोन्ही नेत्यांमध्ये होणार चर्चा
2 पंतप्रधान मोदी चीनमध्ये पोहोचले, ताणलेले संबंध सुधारण्यावर भर
3 न्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच!
Just Now!
X