News Flash

धक्कादायक ! तीन महिन्यांच्या गर्भवती गाईवर बलात्कार, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास केला जात आहे

आंध्र प्रदेशात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पिथापुरम मंडल येथील गोकिवाडा गावात अज्ञात लोकांविरोधात एका गाईवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक शेतकरी नामा राजू यांनी रविवारी सकाळी तक्रार केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. गाय बेपत्ता झाल्याने नामा राजू तिचा शोध घेत होते. गाय तीन महिन्यांची गर्भवती असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास केला जात आहे.

नामा राजू यांची गोकिवाडा आणि बी कोथुरु दरम्यान गोशाळा आहे. या गोशाळेत तीन गाई, दोन बैल आहेत. रविवारी सकाळी गाय बेपत्ता झाल्यानंतर नामा राजू तिचा सगळीकडे शोध घेत होते. अखेर एका शेतात गाय झाडाला बांधलेल्या अवस्थेत त्यांना आढळली. तिच्या गुप्तांगातून रक्त वाहत होतं.

नामा राजू आपल्या गाईला तपासणी करण्यासाठी स्थानिक पशुवैद्यकाकडे गेले असता तिच्यासोबत लैंगिक अत्याचार झाल्याचं त्यांनी सांगितलं. डॉक्टरांनी सांगितलं की, अत्याचार करण्याआधी गाईला इंजेक्शन देण्यात आलं होतं. यानंतर नामा राजू यांनी पिथापुरम ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली.

बातमी समजताच स्थानिकांनी पोलीस ठाण्यात प्रचंड गर्दी केली. यावेळी आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली. अशा घटना याआधीही घडल्या असल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे. पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2018 5:31 pm

Web Title: rape on 3 month pregnant cow
Next Stories
1 मुहूर्तावर दफन करण्यासाठी तो आईच्या मृतदेहासमोर १८ दिवस बसला
2 AgustaWestland Scam : मिशेलची युपीएच्या बैठकांपर्यंत होती पोहोच!
3 धक्कादायक ! बलात्कार पीडितेवर मदतीच्या नावाखाली अनोळखी लोकांनीही केला अत्याचार
Just Now!
X