X
X

रतन टाटांना ‘ती’ म्हणाली ‘छोटू’, अन्…

READ IN APP

सोशल मीडियावर होतेय व्हायरल

काही दिवसांपूर्वी इस्टाग्रामवर प्रदार्पण करणारे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या पोस्टला प्रचंड प्रतिसात मिळत आहे. त्यांनी नुकताच एक फोटो शेअर केला आणि त्यावर अनेक प्रतिक्रियाही आल्या. पण, त्यातील एक प्रतिक्रिया अजब होती. एका महिलेने त्यांना प्रतिक्रियेत ‘छोटू’ असं संबोधलं आणि त्यावर रतन टाटा यांनीही मोठ्या मनानं भन्नाट उत्तर दिलं. त्या महिलेची प्रतिक्रिया आणि त्यावर रतन टाटा यांनी दिलेलं उत्तर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इन्स्टाग्रामवर त्यांच्या फॉलोअर्सची संख्या १० लाखांवर गेली आहे. याबद्दल एक पोस्ट टाकत रतन टाटा यांना जमिनीवर बसलेला एक साधा फोटोही शेअर केला आहे. आपल्याल्या फॉलो करणाऱ्यांना त्यांनी धन्यवादही दिले.

त्यांच्या या पोस्टवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. अजूनही तो सुरूच आहे. एका महिलेने त्यांच्या पोस्टवर “Congratulations chhotu” अशी प्रतिक्रिया दिली. शिवाय त्यासमोर हार्टची इमोजीही शेअर केली. तिच्या या प्रतिक्रियेवर नेटकरी तुटून पडले. अनेकांनी तिची अक्कलही काढली. पण, रतन टाटा यांनी त्या महिलेचा आदर करत भन्नाट रिप्लाय दिला आहे. रतन टाटा यांनी त्या महिलेला दिलेल्या रिप्लायमध्ये म्हणतात… ”प्रत्येकात एक लहान मूल दडलेलं असतं. या महिलेचा कृपया आदर करा.”

इस्टाग्रामवर ट्रोल झाल्यावर त्या महिलेनं आपली कमेंट डिलीट केली. ती कमेंट आणि त्यावर रतन टाटांचा हा रिप्लाय.
पण, कहाणी इथेच संपत नाही… रतन टाटांना हे कळलं आणि त्यांनी परत तिच्या कमेंटबद्दल काही पोस्ट केल्या. त्यात ते म्हणतात.. काल एका महिलेनं आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या. त्यात तिनं मला लहान मूल असंही म्हटलं.

”पण त्यावर नेटकरी संतापले आणि त्यांनी तिची खिल्ली उडवली. अनादर केला. त्यामुळं तिनं आपली कमेंटही डिलीट केली,” असं रतन टाटा यांनी एका पोस्टमध्ये म्हटलं आहे.

त्यानंतरच्या पोस्टमध्ये रतन टाटा म्हणतात.. ”मी त्या महिलेचा आदर करतो. तिच्या भावना मी समजू शकतो. त्याच कौतुकही करतो. मला आशा आहे की यापुढेही असं काही लिहायला अजिबात घाबरणार नाही.”

रतन टाटा यांनी ऑक्टोबर महिन्यात पहिल्यांदाच इन्स्टाग्रामवर अकाउंट सुरू केले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी अनेक पोस्ट केल्या आहेत. त्यांच्या पोस्टपासून अनेक जण प्रेरणाही घेतात.

22
X