निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील कोलकाता उत्तर लोकसभा मतदार संघातील २०० क्रमाकाच्या मतदान केंद्रावर, फेरमतदान घेण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. लोकसभा निवडणूक निकालाच्या आदल्यादिवशी २२ मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत या ठिकाणी मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या सातव्या टप्प्यात १९ मे रोजी या ठिकाणी मतदान झाले होते. पश्चिम बंगालमध्ये मतदाना अगोदर व मतदानाच्या दिवशी देखील मोठा हिंसाचार उफाळला होता. त्यामुळे या ठिकाणी झालेल्या मतदानाबाबतही मोठा वाद निर्माण झाला आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते व केंद्रीय मंत्री पियूष गोयल, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी निवडणूक आयोगाकडे अशा वादग्रस्त मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेतले जावे. अशी मागणी केलेली आहे.