News Flash

खाज नडली… चेहरा खाजवण्यासाठी चोराने काही क्षणांसाठी मास्क काढलं अन्…

हा चोर मास्क घालून वेगवेगळ्या मॉलमध्ये चोऱ्या करायचा

प्रातिनिधिक फोटो (फोटो सौजन्य रॉयटर्स)

मास्क घालूनच घराबाहेर पडणं हे आता सर्वसामान्यांच्या जीवनशैलीचा भागच झालं आहे. अनेक शहरांमध्ये मास्क घातलं नसेल तर दंड आकारला जातोय. त्यामुळेच मास्क घालूनच घराबाहेर पडण्याला अनेकजण प्राधान्य देता असल्याचे दिसत आहे. एकीकडे सार्वजनिक आरोग्यासाठी मास्क घालणं महत्वाचं असलं तरी याच मास्कमुळे पोलिसांचं काम जरा कठीण झालं आहे. मास्क घातल्याने सार्वजनिक ठिकाणी गुन्हे करणाऱ्यांचे चेहरे आधीसारखे लगेच लक्षात येत नसल्याने पोलिसांची अडचण झाल्याचे चित्र दिसत आहे.

नक्की वाचा >> चाकूचा धाक दाखवून बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्याला तरुणीने भोसकलं; २४ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

आधी पोलिसांपासून वाचण्यासाठी गुन्हेगार तोंडावर मास्क लावायचे. आता मास्क लावून हे गुन्हेगार सर्वसमान्यांच्या गर्दीत राहून गुन्हे करताना दिसतात. अशाच पद्धतीची एक विचित्र घटना कोलकात्यामधील मॉलमध्ये घडली आहे. कोलकात्यामधील अनेक मॉल्समध्ये एक चोर तोंडावर मास्क लावून चोऱ्या करायचा. मात्र एका ठिकाणी चेहऱ्याला खाज आल्याने त्याने काही क्षणांसाठी मास्क खाली करुन चेहरा खाजवला आणि त्याचा भांडाफोड झाला.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार याच काही क्षणांसाठी मास्क खाली घेण्याच्या कृतीमुळे चोराची ओळख पटली. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव रतन भट्टाचार्य असं आहे. रतन हा कोलकात्यामधील झंझीरा बाजार परिसरामध्ये राहतो. करोना लॉकडाउनच्या कालावधीमध्ये रतन बेरोजगार झाला. पूर्वी सुरक्षारक्षक म्हणून काम करणार रतन बेरोजगारीमुळे चोऱ्या करु लागला. मास्कच्या आडून रतन मॉलमध्ये चोऱ्या करायचा.

नक्की वाचा >> नवी मुंबई : उघड्यावर लघुशंका करण्यावरुन झालेल्या वादातून एकाची हत्या

२५ डिसेंबर २०२० रोजी किद्दीरोपोरे येथील मॉलमध्ये खरेदी करत असताना रतनने या महिलेची पर्स चोरली. या पर्समध्ये ९९ हजार ३०० रुपये रोख रक्कम, १० अमेरिकन डॉलर आणि ७०० युरो होते. ही पर्स चोरुन मॉलबाहेर पडताना चेहऱ्याला खाज आली म्हणून मॉलच्या प्रवेशद्वाराजवळ रतनने चेहऱ्यावरील मास्क खाली करुन चेहरा खाजवला आणि पुन्हा मास्क लावलं. मात्र या काही क्षणांमध्ये मॉलमधील सीसीटीव्ही कॅमेरात रतनचा चेहरा टीपला गेला. घटना घडल्याच्या सात दिवसानंतर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पोलिसांनी रतनच्या घरावर छापा मारुन त्याला ताब्यात घेतलं. रतनने आपला गुन्हा कबुल केला आहे. रतनने आतापर्यंत अशापद्धतीने किती ठिकाणी चोऱ्या केल्यात याचा शोध पोलीस घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2021 8:37 am

Web Title: robber takes off mask to scratch face for a moment gets caught by cops scsg 91
Next Stories
1 चाकूचा धाक दाखवून बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्याला तरुणीने भोसकलं; २४ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
2 ब्रिटनमध्ये संपूर्ण लॉकडाउनची घोषणा
3 शेतकऱ्यांवरील अत्याचारांच्या चौकशीसाठी पंजाबच्या विद्यार्थ्यांचे सर्वोच्च न्यायालयाला पत्र
Just Now!
X