लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हंगामी अर्थमंत्री टीका माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांनी केली आहे. अल्प भूधारक शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये तर 5 एकरापर्यंत जमीन असणाऱ्यांना प्रति महिना 500 रुपये दिले जाणार आहेत. मात्र या किरकोळ मदतीमुळे शेतकऱ्याचा मान राखला जाईल असे वाटते का? असा प्रश्नही थरुर यांनी विचारला आहे. या बजेटमध्ये पाच लाखांवरच्या उत्पन्नावर कर लागणार नाही एवढा एक निर्णय सोडला तर या बजेटमध्ये काहीही अर्थ नव्हता अशी टीका शशी थरुर यांनी केली आहे.

 

आज पियूष गोयल यांनी अर्थसंकल्प सादर केला, या अर्थसंकल्पात अनेक लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या. शेतकरी, कामगार आणि मध्यमवर्गीय नोकरदार यांना डोळ्यासमोर ठेवून या घोषणा करण्यात आला. या अर्थसंकल्पात पाच लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त जाहीर करण्यात आला तेव्हा लोकसभेत मोदी मोदीचा गजर ऐकण्यास मिळाला. लोकसभेत बजेट सादर होत असताना पहिल्यांदाच अशा प्रकारे घोषणा झाल्या. कामगार आणि शेतकऱ्यांसाठी लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या. या अर्थसंकल्पावर काँग्रेसने मात्र टीका केली आहे.