News Flash

बाप रे!: करोना हवेतून पसरतो, केवळ सोशल डिस्टन्स पुरेसं नाही – लॅन्सेटचा अहवाल

लॅन्सेटच्या अहवालामुळे खळबळ

करोनापुढे अख्खं जग हतबल झालं आहे. लॉकडाऊन लावलं, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले, मास्क घातलं मात्र करोना काही संपण्याचं नाव घेत नाही. उलट करोनाची भारतात दूसरी लाट आली आहे. करोनाच्या लाटेनं अनेकांना आपल्या कवेत घेतलं आहे. त्यामुळे करोना रोखण्यासाठी काय करायचं असा प्रश्न उभा राहिला आहे. अनेक राज्यांनी लॉकडाऊनचा पर्याय निवडला आहे. अशात लॅन्सेटच्या अहवालामुळे एकच खळबळ उडाली आहे. करोना विषाणू हवेतून पसरत असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर भविष्यात आणखी ताण येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

करोना विषाणू हवेतून पसरत असल्याचा पुरावा असल्याचा दावा या समितीने केला आहे. सहा तज्ज्ञांच्या समितीने सखोल अभ्यास करून अहवालात ही बाब नमूद केली आहे. या समितीत अमेरिका, इंग्लंड, कॅनडामधील तज्ज्ञांचा समावेश आहे. यात रसायनशास्त्रज्ञ जोस लुईस जिमेनेज यांचाही समावेश आहे. ते कॉऑपरेटिव्ह इंस्टिट्यूट फॉर रिसर्च इन इनव्हारनमेंटल सायन्स आणि कॉलोरांडो विद्यापीठात कार्यरत आहेत.

लॅन्सेटच्या अहवालाची समीक्षा ऑक्सफर्ड विद्यापीठानंही केली आहे. त्यांनीही हवेतून विषाणू पसरत असल्याच्या मुद्द्यावर जोर दिला आहे. मोठ्या ड्रॉपलेटमधून करोना पसरतो यात कोणतंच तथ्य नाही. उलट हवेतून करोना परसत असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं हा अहवाल गंभीरतेने घेऊन विषाणू रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असंही नमूद केलं आहे.

लोकल प्रवासाविना चार हजार एचआयव्ही रुग्णांची औषधासाठी तडफड!

करोनावर रिसर्च करण्याऱ्या तज्ज्ञांनी या अहवालात स्कॅगिट चॉयर आउटब्रेकची संज्ञा मांडली आहे. यात एका व्यक्तीकडून ५३ जणांना करोनाची लागण झाली होती. यात केलेल्या निरीक्षणात प्रत्येक व्यक्ती एकाच पृष्ठभागावर हात लावण्यास गेली नव्हती आणि एकमेकांच्या संपर्कातही आली नव्हता. तरीही त्या लोकांना करोनाची लागण झाली. याचा अर्थ करोना हवेतून पसरतो असा निष्कर्ष मांडण्यात आला. करोनाचा प्रसार बंदीस्त जागेपेक्षा बाहेर सर्वाधिक वेगाने पसरत असल्याचं यात सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर बऱ्याच लोकांना लक्षणं दिसत नाहीत. मात्र त्यांच्या माध्यमातून करोनाचा फैलाव होत आहे. त्यामुळे मोठ्या ड्रॉपलेटपेक्षा हवेतून सर्वात जास्त वेगाने करोनाचे फैलाव होत असल्याचं मत या अहवालात मांडण्यात आलं आहे.

VIDEO: करोनाचे उपचार घेणाऱ्यांना कलिंगडातून खर्रा आणि दारु पुरवठा; यवतमाळमधील धक्कादायक प्रकार

वारंवार हात धुवून करोना रोखणं कठीण आहे. त्यासाठी आता गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं आवश्यक आहे. तसेच व्हेंटिलेशन, एअर फिल्ट्रेशन, मास्क घालणं, पीपीई किट यासारख्या गोष्टींवर भर देणं आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2021 7:44 pm

Web Title: sars cov 2 is transmitted primarily by airborne route the lancet report rmt 84
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 ICSE बोर्डाचा दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्या निर्णय!
2 Zoom Call: …कॅमेरा ऑन झाला अन् खासदार चक्क नग्नावस्थेत दिसले
3 नीरव मोदीच्या भारतात प्रत्यार्पणासाठी इंग्लंडचा हिरवा कंदील
Just Now!
X