News Flash

काँग्रेसने पाठ्यपुस्तकातून हटवला सावरकरांचा ‘वीर’ हा उल्लेख

पाठ्यपुस्तकातील या नव्या मजकुरामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हं आहेत

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे संग्रहित छायाचित्र

राजस्थानमधल्या काँग्रेस सरकारने पाठ्यपुस्तकात बदल करत त्यामध्ये विनायक दामोदर सावरकर यांच्या नावापुढील वीर हा उल्लेख टाळला आहे. अशोक गेहलोत सरकारने पाठ्यपुस्तकांमध्ये बदल केले आहेत. त्या बदलांमध्ये सावरकरांच्या नावाआधी येणारा वीर हा उल्लेख टाळला आहे. राजस्थान बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने अनेक पाठ्यपुस्तकांमध्ये बदल केला आहे. या बदलांमध्ये सावरकरांच्या नावपुढचे वीर हा उल्लेख टाळला आहे. नव्याने छापण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये हा बदल करण्यात आला आहे.

पाठ्यपुस्तकांमधील बदलांसंदर्भात एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने १३ फेब्रुवारीपासून दिलेल्या सूचनांच्या आधारे हे बदल करण्यात आले आहेत. आधी असलेल्या पुस्तकांमध्ये काय काय बदल केले गेले पाहिजेत हे या समितीने सुचवले आहे. आधीच्या पुस्तकांमध्ये ज्या ठिकाणी स्वातंत्र्याच्या चळवळीचा उल्लेख होता त्या ठिकाणी सावरकरांच्या नावापुढे वीर ही उपाधी देण्यात आलेली होती. मात्र आता नव्याने छापलेल्या पुस्तकांमध्ये हा उल्लेख नाही.

जुन्या पुस्तकात सावरकर यांच्याविषयी काय उल्लेख?
वीर सावरकर असं त्यांच्या नावपुढे लिहिण्यात आलं होतं. सावरकरांनी स्वातंत्र्यलढ्यात काय आणि कसं योगदान दिलं हे या मजकुरात देण्यात आलं होतं.

नव्या पुस्तकात काय छापण्यात आले आहे?

स्वातंत्र्य चळवळीतले नेते या मजकुरात विनायक दामोदर सावरकर असे छापण्यात आले आहे. त्यांच्या नावपुढची वीर ही उपाधी हटवण्यात आली आहे. सेल्युलर जेलमध्ये सावरकारांचा छळ करण्यात आला असा उल्लेख नव्या मजकुरात आहे. एवढंच नाहीतर सावरकरांनी स्वतःला सन ऑफ पोर्तुगाल म्हटल्याचा उल्लेख या माहितीत केला गेला आहे. हिंदू राष्ट्र ही संकल्पना सावरकरांनी पुढे आणली. भारत छोडो या चळवळीला सावरकरांनी विरोध केला असे यात म्हटले गेले आहे. तसेच पाकिस्तानच्या निर्मितीला सावरकरांचा विरोध होता असाही उल्लेख करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2019 12:09 pm

Web Title: savarkar loses veer as congress govt rewrites school textbooks in rajasthan scj 81
Next Stories
1 काँग्रेसप्रणीत UPA मुळे चांद्रयान-२ च्या लॉन्चिंगला सात वर्ष उशीर – इस्त्रोचे माजी अध्यक्ष
2 IIT-JEE प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर, महाराष्ट्राचा कार्तिकेय देशात पहिला
3 छत्तीसगडमध्ये चकमकीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान
Just Now!
X