04 March 2021

News Flash

SBI मध्ये महत्वपूर्ण बदल, १३०० शाखांचे बदलले IFSC कोड

स्टेट बँक ऑफ इंडियाने सहा संलग्न बँकांचे आपल्यामध्ये विलीनीकरण केल्यानंतर देशभरातील १३०० शाखांची नावे आणि आयएफएससी कोड बदलले आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडियाने सहा संलग्न बँकांचे आपल्यामध्ये विलीनीकरण केल्यानंतर देशभरातील १३०० शाखांची नावे आणि आयएफएससी कोड बदलले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. एसबीआयने नावे बदलल्यानंतर नव्या शाखांचे कोड आणि आयएफएससी कोड प्रसिद्ध केले आहेत.

मागच्यावर्षी १ एप्रिल २०१७ रोजी सहा संलग्न बँका आणि भारतीय महिला बँकेचे एसबीआयमध्ये विलीनीकरण करण्यात आले. या विलीनीकरणामुळे एसबीआयचा विस्तार आणि मूल्यांकन दोन्हीमध्ये वाढ झाली आहे. देशभरातील एसबीआयच्या १२९५ शाखांमध्ये बदल झाले असून त्यासंबंधीची सर्व माहिती एसबीआयच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

संपत्तीच्या बाबतीत जगातल्या आघाडीच्या बँकांमध्ये एसबीआय ५३ व्या स्थानावर आहे. ३० जून २०१८ रोजी एसबीआयची एकूण संपत्ती ३३.४५ लाख कोटी रुपये होती. डिपॉझिट, अॅडव्हान्स, ग्राहकसंख्या आणि शाखा याचा विचार करता एसबीआय देशातील सर्वात मोठी बँक आहे. एसबीआयच्या एकूण २२ हजार ४२८ शाखा आहेत. संलग्न बँका आणि भारतीय महिला बँकेच्या विलीनीकरणामुळे एसबीआयच्या १,८०५ शाखा कमी झाल्या. एसबीआयकडे आधी २ लाख कर्मचारी होते. विलीनीकरणानंतर कर्मचारी संख्यामध्ये ७१ हजाराने वाढ झाली आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2018 12:26 am

Web Title: sbi changed ifsc code of 1300 branches
टॅग : Sbi
Next Stories
1 Bogus Pan Card : 25 हजार पगार असलेला सेल्समन 13 कंपन्यांचा संचालक, 20 कोटींचे व्यवहार
2 कारभार सुधारा, नाही तर अस्तंगत व्हा!
3 व्यवसाय मार्गदर्शन संस्था अखेर बंदच!
Just Now!
X