लोकसभा निवडणूक रद्द करण्यात यावी अशी मागणी करणारी जनहित याचिका सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी (दि.५) फेटाळून लावली. या याचिकेमध्ये निवडणुकीतील मतदान यंत्रांच्या वापरावर संशय व्यक्त करण्यात आला आहे.


सुनावणीदरम्यान, न्या. रोहिंगटन यांनी वकील मनोहर लाल शर्मा यांच्या याचिकेवर सुनावणीला नकार दिला तसेच तुम्ही संपूर्ण लोकसभा निवडणूकच रद्द करण्याची मागणी करीत आहात? असा आश्चर्यपूर्ण सवाल केला.