सिक्कीममध्ये भारत-चीन सीमेजवळ लष्करी अधिकाऱ्याच्या १३ वर्षीय मुलासह तीन भारतीय जवानांचा अपघातामध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली. रविवार (२० डिसेंबर) रोजी येथील नाथुलाजवळ १७ व्या मैलावर लष्कराचे एक वाहन जवाहरलाल नेहरू मार्गावरून खाली घसरून दरीत कोसळल्याने हा अपघात घडला. पूर्व सिक्कीमचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) एसई येलसरी यांनी याबाबत माहिती दिली. या अपघतात गंभीर जखमी झालेल्या आणखी एका जवानावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, तीन जवान व लष्करी अधिकाऱ्याच्या मुलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. Sikkim: Three Indian Army soldiers along with a 13-year-old child of a Colonel lost their lives when their vehicle fell down from a snow-laden Jawahar Lal Nehru Road at 17th mile near Nathula on 20th December. One soldier was critically injured and shifted to a local hospital. pic.twitter.com/4RkNDuKBQC — ANI (@ANI) December 21, 2020 बर्फाच्छादित रस्ते असल्याने गाडी मार्गावरून घसरल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवल्या गेला आहे. तर, गाडी दरीत कोसळल्यानंतर गाडीचा अक्षरश: चुराडा झाल्याचे दिसून आले.