काँग्रेस कमिटीचे सचिव आणि माध्यम प्रमुख जनार्दन व्दीवेदी यांनी केलेला उद्धटपणा आणि रूक्षपणाच्या वागणुकीबद्दल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सहा जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास दुरध्वनीवरून माजी न्यायाधीश जे.एस.वर्मा यांच्याजवळ माफी मागितली. न्यायाधीश वर्मा हे वाढत्या बलात्काराच्या घटनांना आळा घालण्यासाठी कायद्यात कोणत्या तरतुदी आणि बदल करता येतील यासाठी नेमण्यात आलेल्या त्रीसदस्यीय कमिटीचे अध्यक्ष आहेत. या कमिटीने २३ जानेवारी रोजी याबद्दलचा अवहाल देखील सादर केला आहे.
“पाच जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास, माझ्या घरी एक अनोळखी व्यक्ती आला त्यामुळे मी आणि माझे कुटूंब अचानक जागे झालो. आलेल्या व्यक्तीने मला जनार्दन व्दीवेदी यांनी पाठवले असल्याचे सांगत होता आणि त्याने पक्षामार्फत कमिटीच्या अवहालासाठी काही सुचक गोष्टी आणल्या असल्याचे सांगितले. आणि मी ते नाकारले आणि तो अहवाल दारावर सोडून जाण्यास सांगितले किंवा दुस-या दिवशी ‘विज्ञान भवन’ या कमिटीच्या कार्यालयात घेऊन येण्यास सांगितले. दुस-या दिवशी मला झालेला मनस्ताप मी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या निदर्शनास आणला, आणि कोणीही असे कसे करू शकते, तेही देशाच्या राष्ट्रीय स्तरावरील पक्षाचा व्यक्ती असे कसे वागू शकतो? याघटनेनंतर काही तासांतच मला सोनिया गांधी यांनी माझ्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि झालेल्या झालेल्या घटनेबद्दलची माफी मागीतली” असे न्यायाधीश वर्मा यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले.