News Flash

अतिरेक्यांचे दिवस भरले! स्नायपर्स, रडार, एनएसजी कमांडो काश्मीरमध्ये दाखल

काश्मीर खोऱ्यात लवकरच एनएसजी कमांडो तैनात होणार आहेत. श्रीनगर येथील बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या तळावर सध्या या एनएसजी कमांडोंचे जोरदार प्रशिक्षण सुरु आहे.

काश्मीर खोऱ्यात लवकरच एनएसजी कमांडो तैनात होणार आहेत. श्रीनगर येथील बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या तळावर सध्या या एनएसजी कमांडोंचे जोरदार प्रशिक्षण सुरु आहे. एनएसजी ही भारताची एलिट कमांडो फोर्स आहे. ब्लॅक युनिफॉर्म ही या फोर्सची ओळख असून सध्या अन्य सुरक्षा दलांबरोबर त्यांचा सराव सुरु आहे. अचूक नेम धरणारे एनएसजीचे जवळपास दोन डझन स्नायपर्स मागच्या दोन आठवडयांपासून जोरदार सराव करत आहेत.

पुढच्या काही दिवसात बीएसएफच्या तळावर १०० एनएसजी कमांडो तैनात होतील अशी गृहमंत्रालयाला आशा आहे. अपहरणविरोधी कारवाईमध्ये हे कमांडो पारंगत असून त्यांना विमानतळाजवळ तैनात केले जाईल असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. केंद्रीय गृहमंत्रालयाने मागच्या महिन्यात काश्मीरमध्ये एनएसजी कमांडोंच्या तैनातीला मंजुरी दिली.

काश्मीर खोऱ्यात लवकर तुम्हाला एनएसजी कमांडो दहशतवाद्यांविरोधात कारवाई करताना दिसतील. काश्मीर खोऱ्यात केंद्राला दहशतवाद्यांविरुद्ध कारवाईला वेग द्यायचा आहे. एनएसजी कमांडोंच्या उपस्थितीमुळे सुरक्षा दलांची जिवीतहानी कमी होईल असे अधिकाऱ्याने सांगितले. भाजपाने पीडीपीचा पाठिंबा काढल्यामुळे काश्मीरमध्ये सरकार कोसळले असून इथे आता राज्यपाल राजवट आहे.

राज्यपाल राजवटीत दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करणे अधिक सोपे होईल असे सुरक्षा यंत्रणांना वाटते. एनएसजी अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असतात. मुंबईवर २६/११ दहशतवादी हल्ला झाल्यानंतर एनएसजी कमांडोंना पाचारण करण्यात आले होते. त्यांनीच नंतर सर्व ऑपरेशन केले होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2018 6:53 pm

Web Title: soon nsg commando deploy in kashmir
टॅग : Kashmir
Next Stories
1 फिगर राखण्यासाठी महिला टाळतात स्तनपान – आनंदीबेन पटेल
2 भाजपा सत्तेत आल्यापासून मुस्लिम आणि दलितांविरोधात विष पसरवले जाते आहे-ओवेसी
3 मेलेनिया-इवांकामुळे ट्रम्प यांनी तो वादग्रस्त निर्णय घेतला मागे
Just Now!
X