जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षारक्षकांनी राबवलेल्या ऑपरेशन ऑलआऊट दरम्यान, पोस्टर बॉय आणि एका स्कूलबसवरही त्यांनी केलेल्या दगडांच्या वर्षावात दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत. या बसमधून ४-५ वर्षांची मुले प्रवास करीत होती. दगडफेक करणाऱ्या या टोळीचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्तींपासून माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. त्याहिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी समीर टायगर याचा खात्मा करण्यात आला होता. त्यानंतर काश्मीर खोऱ्यात तणावाचे वातावरण पसरले असून शोपियांतील कनीपोरा भागात आंदोलकांनी दगडफेक केली. चबरोबर पीडीपीचे आमदार मोहम्मद युसूफ बट यांच्या घरातही काही अज्ञातांनी पेट्रोल बॉम्बही फेकल्याचे वृत्त आहे.


या दगडफेकीत जखमी झालेल्या एका विद्यार्थ्याच्या वडिलांनी सांगितले की, माझा मुलगा दगडफेकीत जखमी झाला आहे. हा प्रकार माणूसकीला काळीमा फासणारा आहे. अशी घटना कोणत्याही निरपराध बालकासोबत घडू शकतात, त्यामुळे काळजी घ्यायला हवी. तर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरवरून दगडफेक करणाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. ते म्हणाले, लहान मुलं आणि पर्यटकांवर दगडफेक करुन काय साध्य होणार आहे. अशा हल्ल्यांविरोधात आपण एका आवाजात त्याचा विरोध दर्शवायला हवा.


दरम्यान, जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक एस. पी. वैद्य यांनी या प्रकरणी ट्विट करुन सांगितले की, आंदोलकांनी शोपियांच्या रेनबो स्कूलच्या बसवर दगडफेक केली. यामध्ये दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला मार लागला आहे. या विद्यार्थ्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दगडफेक करणारे आता निरपराध विद्यार्थ्यांना आपला निशाणा करीत आहेत ही बाब मुर्खपणाची आहे. या आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या, शोपियांत स्कूलबसवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेने मी स्तब्ध झाले असून संतापही येत आहे. या भेकड आणि असंवेदनशील घटनेबाबत दोषींना कडक शासन केले जाईल.