18 January 2021

News Flash

सुशांतने मृत्यूच्या दिवशी दुबईतल्या ड्रग डिलरची का घेतली होती भेट? सुब्रमण्यम स्वामींचा सवाल

सुब्रमण्यम स्वामींनी सांगितलं दुबईतील 'त्या' ड्रग डीलरचं नाव?

‘ज्या दिवशी सुशांतचा मृत्यू झाला त्या दिवशी तो दुबईतील ड्रग डिलरला भेटला होता’, असं वक्तव्य भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या आहेत. या पूर्वीदेखील त्यांनी एका मुलाखतीत सुशांतच्या मृत्यूचा आणि दुबई कनेक्शन असल्याचं म्हटलं होतं.

सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाल्यानंतर त्याने आत्महत्या केली नसून ती हत्याच आहे, असा दावा सुब्रमण्यम स्वामी यांनी यापूर्वी केला आहे. तसंच सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा याविषयीदेखील ते आग्रही होते. त्यातच आता त्यांनी केलेलं नवीन वक्तव्य अनेकांचं लक्ष वेधत आहे.


“सुनंदा पुष्कर प्रकरणात सगळ्या महत्त्वाची गोष्ट कोणती होती?, त्यांचं शवविच्छेदन करत असताना एम्सच्या डॉक्टरांना त्यांच्या पोटात कोणती गोष्ट आढळून आली होती? परंतु, श्रीदेवी आणि सुशांत यांच्या प्रकरणात असं काहीच झालं नाही. मात्र सुशांत प्रकरणात दुबईतील ड्रग्स डिलर अयाश खान सुशांतच्या मृत्यूच्याच दिवशी त्याला भेटला होता. का?”, असे प्रश्न सुब्रमण्यम स्वामी यांनी उपस्थित केले आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सुब्रमण्यम स्वामी यांनी टाइम्स नाऊला मुलाखत दिली होती. त्यावेळी बोलत असताना सुशांतची हत्या पूर्ण प्लानिंगनुसार केली आहे असं ते म्हणाले होते. मात्र आता त्यांनी थेट दुबईतील ड्रग्स डीलरचं नाव जाहीर केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2020 10:32 am

Web Title: subramanian swamy claim sushant singh rajput have met dubai drug dealer ayash khan on the day of death ssj 93
Next Stories
1 जर्मनीचा पाकिस्तानला झटका, पाणबुडया लपवण्यासाठी नाही करणार मदत
2 सकारात्मक… देशात २४ लाखांपेक्षा जास्त रुग्ण करोनामुक्त
3 रावळपिंडीत अब्दुल रौफ असगर-ISI मध्ये गुप्त बैठक, भारतीय यंत्रणा हाय अलर्टवर
Just Now!
X