News Flash

रामजन्मभूमी वादात सुब्रह्मण्यम स्वामी पक्षकार

रामजन्मभूमीच्या ठिकाणी राममंदिर होते व तेथे मशीद नव्हती, असे स्वामी यांचे म्हणणे आहे.

| February 27, 2016 03:10 am

शशिकला यांना मुख्यमंत्रीपदी बसण्याचा घटनात्मक अधिकार आहे असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले.

सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

अयोध्येतील वादात बाबरी मशीद पाडली त्या ठिकाणी राम मंदिर बांधण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांना पक्षकार करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.

न्या. व्ही गोपाल गौडा व अरूण मिश्रा यांनी सांगितले की,याबाबत दाखल असलेल्या नागरी याचिकात स्वामी यांची याचिकाही विचारात घेतली जाईल. राममंदिर उभारणीच्या मागणीवर न्यायालय त्यांच्या याचिकेची स्वतंत्र सुनावणी करणार नाही. अयोध्येत राममंदिर उभारणी हा मूलभूत अधिकार असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. स्वामी यांनी असा दावा केला की, आधी तेथे मंदिर असल्याचे पुरावे असतील तर राम मंदिर उभारणीसाठी मार्ग सुकर करणारे प्रतिज्ञापत्र सरकारने आधीच दिले आहे. पुरातत्त्व विभागाने याबाबत तसे पुरावेही दिले आहेत.  नागरी अपिले प्रलंबित असताना स्वामी यांची याचिका वेगळी विचारात घेता येणार नाही, स्वामी यांनी एकतर उच्च न्यायालयात जावे किंवा आताच्या याचिकेबरोबर त्यांच्या याचिकेची सुनावणी मान्य करावी. स्वामी यांनी याआधी सरन्यायाधीश टी.के ठाकूर यांच्या पीठापुढे तातडीची सुनावणी करण्याची मागणी केली होती. पवित्रतेच्या आधारावर मंदिर व मशीद यांची तुलना होऊ शकत नाही. मशीद हा इस्लाम धर्माचा अविभाज्य भाग नाही असे सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने म्हटले होते. रामजन्मभूमीच्या ठिकाणी राममंदिर होते व तेथे मशीद नव्हती, असे स्वामी यांचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2016 3:10 am

Web Title: subramanian swamy for daily hearing of ram janmabhoomi case in sc
टॅग : Sc
Next Stories
1 अमेरिकेत हल्लेखोराचा बेछूट गोळीबार; तीन ठार
2 हुगळी, यमुनेच्या किनारी भागात भूकंपाचा धोका
3 पठाणकोट तपासासाठी पाकिस्तानकडून नवीन पथक
Just Now!
X