News Flash

सुनंदा पुष्कर यांचा व्हिसेरा परदेशात पाठविण्याबाबतचा निर्णय एक-दोन दिवसांत

काँग्रेसचे नेते शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या व्हिसेऱ्याचे नमुने कोणत्या देशात पाठवायचे याबाबतचा निर्णय विशेष तपास पथक (एसआयटी) येत्या एक-दोन दिवसांत घेणार आहे,

| January 13, 2015 06:53 am

काँग्रेसचे नेते शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या व्हिसेऱ्याचे नमुने कोणत्या देशात पाठवायचे याबाबतचा निर्णय विशेष तपास पथक (एसआयटी) येत्या एक-दोन दिवसांत घेणार आहे, असे दिल्लीचे पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी सांगितले.
सुनंदा पुष्कर यांच्या व्हिसेऱ्याचे नमुने अमेरिका अथवा इंग्लंडमध्ये पाठविण्यात येण्याची शक्यता आहे. त्यांना झालेली विषबाधा कोणत्या स्वरूपाची आणि किती प्रमाणात झाली ते तपासण्यात येणार आहे.
व्हिसेरा परदेशात पाठविण्यात येणार आहे आणि त्याबाबतचा निर्णय एक-दोन दिवसांत घेण्यात येणार आहे. सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू अनैसर्गिक असून तो विषबाधेमुळे झाल्याचा वैद्यकीय अहवाल मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी १ जानेवारी रोजी खुनाचा गुन्हा नोंदविला. विष कोणत्या स्वरूपाचे होते आणि किती प्रमाणात होते ते स्पष्ट करण्यात आलेले नाही.
शशी थरूर यांच्या चौकशीबाबत विचारले असता बस्सी म्हणाले की, विशेष तपास पथक निश्चित कृती योजनेद्वारे कृती करीत असून आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2015 6:53 am

Web Title: sunanda murder case decision in 2 days on where viscera sample will be sent
टॅग : Shashi Tharoor
Next Stories
1 काश्मीरचा मुद्दा वगळून भारताशी चर्चा नाही
2 अमेरिकेच्या लष्कराचे ट्विटर आणि यूट्यूब अकाऊंट ‘आयएसआयएस’कडून हॅक!
3 राम नाईकांना हटवण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली
Just Now!
X