News Flash

रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी राज्यांनी सहकार्य करावे – प्रभू

रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी राज्य सरकारांनी रेल्वेला सहकार्य करावे

| June 10, 2016 02:06 am

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी कोलकात्यात राज्याशी संबंधित विविध रेल्वे प्रकल्पांबाबत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी चर्चा केली.

रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी राज्य सरकारांनी रेल्वेला सहकार्य करावे, अशी इच्छा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केली आहे.
राज्यांसमवेत आम्हाला संयुक्त प्रकल्प हवा आहे. स्थानकांच्या विकासासाठी, फेरविकासासाठी राज्य सरकारांनी रेल्वेला सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात येणार आहे, असे प्रभू यांनी हावडा स्थानकावर झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी सांगितले.
रेल्वेमंत्र्यांनी या वेळी पूर्व रेल्वे, दक्षिण-पूर्व रेल्वे आणि मेट्रो रेल्वेच्या अनेक प्रकल्पांचे येथे उद्घाटन केले. पश्चिम बंगाल हे देशातील एक महत्त्वाचे स्थान आहे. या राज्याच्या विकासासाठी रेल्वे आपल्या स्रोतांचे सहकार्य देईल, असेही प्रभू म्हणाले.
प्रवासी सेवा आणि पायाभूत सुविधांचा विकास यासाठी वेळ लागेल. आम्ही प्रवाशांच्या सेवेवर अधिक भर देत आहोत. प्रवाशांचे
समाधान महत्त्वाचे आहे, गेल्या १८ महिन्यांत आम्ही १००हून अधिक बाबींमध्ये पुढाकार घेतला आहे, असे ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2016 2:06 am

Web Title: suresh prabhu stresses on railways infrastructure development in west bengal
Next Stories
1 नीलगाईंच्या कत्तलीवरून केंद्रीय मंत्र्यांमध्येच वाद
2 संवाद प्रक्रिया रखडवण्यासाठी पठाणकोट हल्ल्याचे ‘निमित्त’
3 चीनची पाकिस्तानात साडेआठअब्ज डॉलर्सची गुंतवणूक
Just Now!
X