आयसिस या दहशतवादी संघटनेने इराकमधून अपहरण केलेल्या ३९ भारतीयांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी २० मार्च रोजी राज्यसभेमध्ये बोलताना दिली आहे. मोदी सरकारने ही माहिती जाहीर केल्यानंतर काँग्रेससहीत अनेक विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर टिका केली. या टिकेमध्ये लोकांना सहभागी करून घ्यावं या उद्देशानं काँग्रेसनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून परराष्ट्र खात्याला लक्ष्य करणारा पोलही घेतला. परंतु लोकांनी बहुमतानं परराष्ट्र खात्याची पाठराखण केल्यामुळे काँग्रेसची फजिती झाल्याचं बघायला मिळत आहे.
भाजपा विरोधी रणनितीचा एक भाग म्हणून काल (सोमवारी २६ मार्च रोजी) काँग्रेसने आपल्या टविटर हॅण्डलवरून एक जनमत चाचणी (ट्विटर पोल) घेतली. यामध्ये ‘इराकमध्ये ३९ भारतीयांचा झालेला मृत्यू म्हणजे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे सर्वात मोठे अपयश आहे असे तुम्हाला वाटते का?’ हा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर ३३ हजार ८७९ ट्विपल्सने आपले मत नोंदवले. त्यापैकी ७६ टक्के लोकांनी नाही असे उत्तर देत हे मृत्यू म्हणजे सुषमा स्वराज यांचे अपयश नसल्याचे मत नोंदवले आहे. तर २४ टक्के लोकांनी हे मृत्यू म्हणजे परराष्ट्र मंत्री आणि परराष्ट्र मंत्रालयाचे अपयश असल्याचे मत नोंदवले आहे. विशेष म्हणजे स्वराज यांना कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेसने घेतलेल्या या मत चाचणीमध्ये काँग्रेसच तोंडघशी पडल्याचे दिसून आले.
Do you think the death of 39 Indians in Iraq is Sushma Swaraj’s biggest failure as Foreign Minister? #IndiaSpeaks
— Congress (@INCIndia) March 26, 2018
आकड्यांचा खेळ
प्रश्न: इराकमध्ये ३९ भारतीयांचा झालेला मृत्यू म्हणजे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे सर्वात मोठे अपयश आहे असे तुम्हाला वाटते का?
एकूण मते: ३३ हजार ८७९
होय – २४ टक्के
नाही – ७६ टक्के
सुषमा स्वराज यांच्या विरोधी मते: ८ हजार १०० हून थोडी अधिक
सुषमा स्वराज यांच्या बाजूने मते: २५ हजार ७४० हून थोडी अधिक
एकूण रिट्विट्स – २ हजार ५५९
एकूण लाइक्स – १ हजार ७५०
एकूण कमेन्टस – १ हजार २००
सुषमा स्वराज यांनी केले रिट्विट
काँग्रेसच्या या फजितीचा फायदा उठवायला सुषमा स्वराज चुकल्या नाहीत. त्यांनीही काँग्रेसच्या औपचारिक ट्विटर हॅण्डलवरून ट्विट करण्यात आलेला हा पोल रिट्विट केला. स्वराज यांच्या ट्विटर प्रोफाइलवर हा पोल पाहून अनेकांनी कमेन्टमध्ये आश्चर्य व्यक्त केले. तर अनेकांनी स्वराज यांनी ही संधी अचूक साधल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

नेटकऱ्यांनी उडवली काँग्रेसची खिल्ली…
स्वराज यांनी हा पोल रिट्वीट करताच अनेकांनी काँग्रेस स्वत:चा हिट विकेट झाल्याच्या आशयाचे ट्विटस करत काँग्रेसची खिल्ली उडवली. पाहा असेच काही ट्विटस
1
Interesting that @SushmaSwaraj has retweeted this tweet by Cong. https://t.co/psU6rjZzNf
— Maneesh Chhibber (@maneeshchhibber) March 27, 2018
2
The question is interesting..
“Doesn’t the NO votes mean that there is another failure of Sushma Swaraj as Foreign Minister which is bigger than this failure?”https://t.co/DYOdeEmauT— Lie, PMs way of life (@MrRightCenter) March 27, 2018
3
This happens when you are true to your work……@SushmaSwaraj pic.twitter.com/QzNYKLBhk9
— Shubham Pandey (@pandeyjiki_suno) March 27, 2018
4
No wonder if @INCIndia delete this Tweet after @SushmaSwaraj ji retweeted