X

करोनामुळे स्वयंघोषित स्वामी नित्यानंद भयभीत; कैलासात येण्यावर घातले निर्बंध

करोनामुळे स्वयंघोषित स्वामी नित्यानंद भीतीच्या सावटाखाली

सेक्सटेप प्रकरणातील स्वयंघोषित गुरू स्वामी नित्यानंद करोनाच्या फैलावामुळे भयभीत झाला आहे. त्याने वसवलेल्या कैलासा देशात करोनाचा फैलाव होऊ नये यासाठी आदेश काढला आहे. या आदेशानुसार भारतासह ब्राझील, युरोप आणि मलेशियातून येण्याऱ्या भक्तांना बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर जगभरातील आश्रमही बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आश्रमातील भक्तांनाही कैलासात प्रवेश नाकारण्यात आला आहे. नित्यानंदने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून ही माहिती दिली आहे.

नित्यानंदने वसवलेलं कैलासा बेट जगाच्या पाठीवर नक्की कुठे आहे याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण विविध माहितीच्या आधारे ऑस्ट्रेलियाच्या जवळपास कुठेतरी हे बेट असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाहून कैलासा बेटावर जाण्यासाठी नित्यानंद याने ‘गरूडा’ नावाची चार्टर्ड फ्लाईट सर्व्हिसही सुरू केल्याची चर्चा आहे. तर नित्यानंदने कैलासात आपलं सरकार, मंत्री, मंत्रालय यासह बँक, मॉल आणि अन्य सुविधा सुरु केल्याचाही दावा केला आहे.

“दोन कानाखाली लावेन,” आईसाठी ऑक्सिजन मागणाऱ्या तरुणाला भाजपा खासदाराची धमकी

कोण आहे नित्यानंद?

नित्यानंद हा मूळचा तामिळनाडूचा आहे. त्याचे खरं नाव राजशेखरन असं आहे. २००० साली त्याने बंगळूरु शहराजवळ स्वत:चे आश्रम सुरु केले. तेव्हापासूनच तो चर्चेत आला. तो स्वत:ला ईश्वराचा अवतार मानतो. २०१० साली त्याच्यावर दोन मुलींचे अपहरण करुन त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी गुजरातमधील अहमदाबाद पोलिसांकडे गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर बलात्कार प्रकरणात पौरुषत्वाची चाचणीचे प्रकरणही चांगलेच गाजले होते. गुजरात पोलिसांनी नित्यानंदने भारतामधून पलायन केल्याची माहिती न्यायलयाला दिली. कर्नाटक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१८ साली नित्यानंदला जामीन मंजूर झाला. याचाच फायदा घेत तो देशातून पळून गेला.

24
READ IN APP
X