News Flash

दागिन्यांच्या दोन लाखांवरील रोखीतील खरेदीवर करआकारणी

१ एप्रिलपासून एक टक्का टीसीएस लागू

| February 20, 2017 03:03 am

१ एप्रिलपासून एक टक्का टीसीएस लागू

दागिन्यांच्या दोन लाखांवरील रोखीतील खरेदीवर १ एप्रिलपासून एक टक्का टीसीएस (टॅक्स कलेक्टेड अ‍ॅट सोर्स) मोजावा लागणार आहे. वित्त विधेयक २०१७ मंजूर झाल्यानंतर हा कर वसूल करण्याचा मार्ग मोकळा होणार असून, रोखीतील मोठय़ा व्यवहारांवर अंकुश लावण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

सध्या दागिन्यांच्या पाच लाखांवरील खरेदीवर टीसीएस लागू होतो. ही मर्यादा दोन लाखांवर आणण्यात येणार आहे. वित्त विधेयक २०१७ मंजूर झाल्यानंतर दागिन्यांनाही सामान्य वस्तूंच्या रांगेत बसवून दागिन्यांच्या दोन लाखांवरील रोखीतील खरेदीवर ग्राहकाकडून एक टक्का टीसीएस वसूल करण्यात येईल.

‘प्राप्तीकर कायद्यातील तरतुदीनुसार वस्तू व सेवांसाठीच्या दोन लाखांवरील रोखीतील व्यवहारावर एक टक्का टीसीएस आकारला जातो. वस्तूंच्या संज्ञेत दागिन्यांचाही समावेश असून, यापुढे हा कर आकारला जाईल,’ असे प्राप्तीकर विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

प्राप्तीकर विभाग १ जुलै २०१२ पासून सोन्याच्या दोन लाखांवरील आणि दागिन्यांच्या पाच लाखांवरील रोखीतील खरेदीवर एक टक्का टीसीएस आकारत आहे. आता हा कर लागू करण्यासाठी दागिन्यांच्या रोखीतील खरेदीची ही मर्यादा दोन लाखांवर आणण्यात आली आहे. तशी तरतूद वित्त विधेयक २०१७ मध्ये करण्यात आली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2017 1:31 am

Web Title: taxation on gold
Next Stories
1 कर्मचारी भविष्य निर्वाह निधी मेपासून ऑनलाइन काढणे शक्य
2 प्रदूषणाचे प्रतिमिनिट दोन बळी..
3 गांधी हत्येतील आरोपींच्या अटकेसाठी काय प्रयत्न केले?
Just Now!
X