News Flash

हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानात शाळा बंद

दहशतवादी हल्ल्यांच्या भीतीमुळे शाळा बंद ठेवल्याने दहशतवाद्यांचे मनोधैर्य वाढते

| January 29, 2016 12:08 am

दहशतवादी हल्ल्यांच्या भीतीमुळे शाळा बंद ठेवल्याने दहशतवाद्यांचे मनोधैर्य वाढते, अशी टीका पाकिस्तानच्या अंतर्गत मंत्र्यांनी पंजाब प्रांतातील पीएमएल-एन पक्षाच्या सरकारवरच केली आहे.
शाळा सुरू असताना सुरक्षा व्यवस्था अधिक कडेकोट करता येते. भीती आणि दहशतवादाच्या वातावरणाविरोधात आम्ही एकजुटीने लढणार असल्याचा संदेश आपण दिला पाहिजे, असे निसार अली खान यांनी म्हटले आहे.
पंजाब सरकारने कडाक्याच्या थंडीचे कारण देऊन शाळा एक आठवडय़ासाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत, मात्र दहशतवादी हल्ल्यांच्या भीतीने सरकारला हा निर्णय घेण्यास भाग पाडले आहे, असे माध्यमांनी सूचित केले. दहशतवादी आता हताश झाले असल्याने सहज लक्ष्य करण्यात येणाऱ्या ठिकाणांकडे त्यांचे लक्ष आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2016 12:08 am

Web Title: terrorist attack on pakistan school
टॅग : Terrorist Attack
Next Stories
1 बिहारमध्ये दोन ठिकाणी डॉक्टरांना बेदम मारहाण
2 दलित विद्यार्थ्यांची आत्महत्या; चौकशीसाठी न्यायिक आयोग
3 हेल्मेटमुळे अतिजोखीम पत्करण्याच्या मानसिकतेतूनही अपघाताचा धोका
Just Now!
X