अमेरिकेच्या नासा या संस्थेने ज्या खासी संस्थांशी करार केला आहे त्यापैकी ‘ऑरबायटल सायन्सेस’ या संस्थेच्या ‘अंटारेस’ या अग्निबाणाचे पहिले चाचणी उड्डाण आज होत आहे. काही तांत्रिक कारणास्तव हे उड्डाण लांबणीवर टाकण्यात आले होते. वॉशिंग्टनपासून २७० कि.मी. अंतरावर असलेल्या व्हर्जिनिया किनाऱ्यावरून हा अग्निबाण सोडला जाणार आहे. जर काही कारणास्तव हे उड्डाण ठरल्याप्रमाणे होऊ शकले नाही तर ते रविवारी केले जाईल.
अंटारेस अग्निबाण हा दोन टप्प्यांचा असून त्याची उंची ४० मीटर आहे. त्याचा व्यास हा ३.९ मीटर असून दहा मिनिटात ते २४९ किलोमीटरच्या कक्षेत जाते.  काही वस्तू आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पाठवण्याचा करार ‘ऑरबायटल सायन्सेस’ या कंपनीशी करण्यात आला असून २०१६ पर्यंत अशी आठ उड्डाणे केली जाणार आहेत.