दहशतवाद व हवामान बदल ही सध्या राष्ट्रकुल देशांपुढेची आव्हाने असून त्यावर मात करण्याची गरज आहे, असे माल्टाचे पंतप्रधान जोसेफ मस्कत यांनी राष्ट्रकुल परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले.

माल्टा या भूमध्य बेटावर द्वैवार्षिक राष्ट्रकुल परिषदेच्या शिखर बैठकीचे उद्घाटन आज झाले. यावेळी भारतासह ५३ देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी अभूतपूर्व सुरक्षा ठेवण्यात आली होती.
राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे युवराज फिलीप यांनी या शिखर बैठकीचे उद्घाटन केले असून ब्रिटिश वसाहतवादातून मुक्त झालेल्या देशांचा राष्ट्रकुल हा गट आहे. भारताचे प्रतिनिधित्व परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केले. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल, श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाल सिरीसेना, ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हीड कॅमेरन या तीन दिवसांच्या शिखर बैठकीसाठी आले आहेत. माल्टाचे पंतप्रधान जोसेफ मस्कत यांनी सांगितले की, दहशतवाद हे राष्ट्रकुलापुढचे मोठे आव्हान असून हवामान बदलांचा प्रश्नही महत्त्वाचा आहे.