करोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर आज देशात सर्वत्र ईद साजरी होत आहे. ईदच्या निमित्ताने सीमेवर मिठाई दिली जाते. भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांकडून मिठाईची देवाणेघेवाण करण्याची पद्धत आहे. पण यंदा या परंपरेत खंड पडला. बीएसएफ म्हणजेच सीमा सुरक्षा दल आणि पाकिस्तानी रेंजर्समध्ये मिठाईची देवाणघेवाण झाली नाही.

यापूर्वी सुद्धा मिठाई देण्याच्या परंपरेत खंड पडला आहे. याला कारण आहे, पाकिस्तानचा कुरापतखोर स्वभाव. सीमेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन, दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी मदत असे प्रकार केले जातात. त्याशिवाय काश्मीर खोऱ्यात दहशतवाद पसरवण्यासाठी पाठबळ दिले जाते.

आणखी वाचा- आमच्या विरोधात काही करण्याची हिंमत केली तर…; पाकिस्तानची भारताला धमकी

पाकिस्तानच्या या नापाक हरकतीमुळे सध्या दोन्ही देशांमध्ये मोठया प्रमाणावर तणाव आहे. त्यामुळेच यंदा मिठाई देण्यात आली नाही. पण बांगलादेश सीमेवर मात्र परंपरेप्रमाणे मिठाईची देवाणघेवाण करण्यात आली. स्वांतत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन , दिवाळी किंवा महत्त्वाच्या दिवशी दोन्ही सीमा दलाकडून मिठाईची देवाणघेवाण होते